चांगदेव शिवारात विद्युत मोटार केबलीच्या चोरीचा धुमाकूळ; पोलीस तक्रार घेईना, शेतकरी राजा वाऱ्यावर
शेतकरी धास्तावले : शेतकरी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्याच्या तयारीत
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधि | शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करित असताना शेतातील पशुधानाची चोरी, विद्युत पंप, वायर चोरीच्या घटना वाढल्याने चिंतेत भर पडली आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव शिवारातून शेतकऱ्यांच्या लाखोंच्या केबल वायरची चोरी गेल्या असून सुस्त पोलीस प्रशासनाची मात्र तक्रार घेण्यास टाळाटाळ करण्यात अव्वल असल्याचे दर्शन घडले आहे. रात्रीची गस्त नसल्याने चोरटे याच संधीचा फायदा घेत शेतशिवारांना लक्ष करीत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भितीयुक्त वातावरण पसरले आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा फाटा ते चांगदेव रस्त्यालगत परिसरात शेतकऱ्यांचे विदयुत मोटार, स्टर्टर, पाईप, वायर चोरणारी मोठी टोळी सक्रिय झाली असुन शेतकऱ्यांचे शेतातील साहित्य चोरीचे जाण्याचे प्रमाण वाढले असल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. अंदाजे सात ते आठ शेतकऱ्यांच्या शेतातून चोरट्यानी 13 ऑगस्ट 2023 च्या मध्यरात्री स्टार्टर डीपी फोडून नुकसान केले तसेच लाखोंच्या केबलची चोरी केली. योगेश राणे, सुरेश राणे, प्रशांत चौधरी, गुलाब पिंजारी, विलास पाटील, सौ ज्योती काठोके यांच्या शेतामधून चोरट्यांनी विद्युत मोटार स्टार्टर डीपी केबलची चोरी केली असून याबाबत गेल्या तीन दिवसांपासून तक्रार देण्यासाठीच शेतकरी चांगदेव ते मुक्ताईनगर चकरा मारत असून पोलीस स्थानकात मात्र शेतकऱ्यांना ताटकळत बसवून ठेवत उडवा उडविची उत्तरे दिली जात असून आता संध्याकाळ झाली,रात्र झाली, आता उद्या बघू, असे पोलिस पेशाला न शोभणारे उत्तरं देत पोलिसांकडून टाळाताळ करण्यात येत आहे. यामागे नेमके काय कारण… की अर्थकारण आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे?
चोरट्यांची प्रत्येक ठिकाणी चोरी करण्याची एकच पद्धत– चोरट्यांनी सहाही शेतकऱ्यांकडे चोरी करताना एकदम शांत डोके ठेवून चोरी करताना दिसून येते चोरट्यांनी प्रथम स्टार्टर चे पेटी चे कुलूप तोडून अथवा पेटी उघडून पद्धतशीरपणे केबल खोलून केबल वरील इन्शुलन्स (आवरण ) कट्टर ने कापून फक्त आतील तांब्याची तार चोरी केल्याचे आढळून आले आहे.
तसेच स्थानिक चांगदेव चे बीट हवालदार विजय पढार यांना पोलिस स्थानकात तक्रारदारांनी आता संध्याकाळी पंचनामा करायला चला असे सांगितले असता आता सोबत कोणी नाही उद्या पाहू अशी उडवा उडवी ची उत्तरे देण्यात आली आज सगळीकडे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात असताना जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांसाठी पोलिस प्रशासनांला वेळ नसेल तर ही मोठी शोकांतिका म्हणावी लागेल? या चोऱ्याना आळा घालण्याची मागणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गेल्या तीन दिवसांपासून चकरा माराव्या लागणे शेती प्रधान देशासाठी शरमेची बाब असून परिसरातील बिट हवलदार यांचे आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी हा खटाटोप आहे का ?
शेतकऱ्यांना आसमानी संकटांनी खुप मोठा अर्थिक फटका बसत आहे. त्यात अश्या चोरीच्या घटना पोलिसांची गस्त कमी. चोरीच्या घटनेची तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्या फिर्यादीचीच उलट तपासणी करणे, तक्रार दाखल करण्यास टाळा टाळा करणे आशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. तर वारंवार होणा-या चोरीच्या घटनेत त्रस्त झालेले शेतकरी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत. यापुर्वी अशाच चोरीच्या घटना झाल्या आहेत. काही वगळता या घटनेचा छडा लावण्यात पोलीसांना यश आले नाही. वरिस्ट अधिकाऱ्यांनी या कडे जातीने लक्ष्य देऊन चोरट्यांना धुडकून काढून तसेच पोलीसांनी गस्त वाढवून चोरट्यांच्या बंदोबस्त करावा आशी मागणी होत आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा