मुक्ताईनगरात खडसें समर्थक आक्रमक : रोहिणी खडसेंचा पोलीस स्टेशनसमोर ठिय्या
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे प्रतिनिधी : मुलीचे सहलीचे फोटो चुकीचे संदर्भ देवून सोशल मिडीयावर व्हायरल केल्याचा आरोप करत मुलीसह तिच्या आईने नगरसेविका पूत्राला शहरात भररस्त्याच मारहाण केल्याची घटना घडली आहे. आता या घटनेवरुन मुक्ताईनगर (muktainagar) शहरात खडसे समर्थकही आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. या घटनेच्या निषेधार्थ एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्यासह खडसे समर्थक हे पोलीस ठाण्यासमोर धरणे आंदोलनाला बसले आहेत.
खडसे समर्थक नगरसेविका पूत्राला मारहाण केल्यावर मुक्ताईनगरात आता राजकीय वातावरण चांगलेच तापले असल्याचे पहायला मिळत आहे. तरुणीसह तिच्या आईने भररस्त्यात अशा पध्दतीने मारहाण करायला नको होती, फोटोत काही आक्षेपार्ह असेल तर कारवाई झालीच पाहिजे फोटो शेयर करणे गुन्हा नाही ही चुकीची बाब आहे,
न्याय व्यवस्थेवर प्रत्येकाचा विश्वास असायला हवा.. त्यांनी कायदेशीरपध्दतीने न्याय मागायला हवा, असे यावेळी धरणे आंदोलन करणाऱ्या रोहिणी खडसे यांनी बोलतांना सांगितलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पोलिस स्टेशन आवारात ठिय्या मांडून बसले आहेत.