भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगरराजकीय

मुक्ताईनगर निवडणूक : प्रभाग १५ मधून सौ. शितल लक्ष्मण सापधरे यांना भाजपची अधिकृत उमेदवारी

मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | नगरपंचायत निवडणुकीत प्रभाग क्रमांक १५ मधून भारतीय जनता पक्षाने सौ. शितल लक्ष्मण सापधरे यांच्या उमेदवारीची घोषणा केली असून प्रभागात उत्साहाचे वातावरण आहे. उमेदवारी जाहीर होताच नागरिकांकडून त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

सापधरे कुटुंबाला गेली ३० वर्षे सामाजिक कार्याचा वारसा आहे. शितल ताई या माजी सरपंच जनतेचे लाडके सेवक स्व. रमेश देवचंद सापधरे व माजी पंचायत समिती सदस्या स्व. प्रतिभाताई सापधरे यांच्या सून आहेत. तसेच त्यांचे पती हे समाजसेवक व व्यावसायिक असून त्यांनी मुक्ताईनगरला भारतातील दुसरे दररोज राष्ट्रगीत म्हणणारे शहर म्हणून गौरव मिळवून दिला.

कोविड काळात सापधरे परिवाराने स्वखर्चाने प्रभागात केमिकल फवारणी, होमिओपथी औषध वितरण, तसेच कोरोना योद्ध्यांचा सत्कार अशा अनेक उपक्रमांद्वारे उल्लेखनीय सेवा बजावली.

लक्ष्मण सापधरे यांच्या प्रमुख सामाजिक कार्यांची झलक

  • आदीशक्ती संत मुक्ताई पाथ व मुक्ताई चौक नामकरणासाठी तत्कालीन ग्रामपंचायत कडून ठराव मंजूर करून घेतला
  • नगरपंचायत सभांमध्ये राष्ट्रगीत व राष्ट्रगान (वंदे मातरम ) परंपरेची सुरूवात करण्यासाठी वेळोवेळी अर्ज करून सुरु केले पं काही दिवसांनंतर अधिकार्यांनी बंद केले ते सभागृहात जर मतदार मायबाप जनतेने संधी दिली तर पुन्हा सुरु करणार
  • मुक्ताईनगरात दररोज सकाळी ८ वाजता राष्ट्रगीत वाजविण्याचा अभिमानास्पद उपक्रम
  • अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ७५ फूट राष्ट्रध्वज उभारणीसाठी शासनस्तरीय पुढाकार (मी केलेले अर्ज व तिकडून आलेले उत्तर उपलब्ध आहेत )
  • महापुरुषांच्या पुतळ्यांजवळ दरवर्षी राष्ट्रध्वज अनावरण व अभिवादन उपक्रम
  • कोविड काळात क्लोरीन फवारणी, औषधांचे वितरण आणि रुग्णांचा सत्कार
  • महाशिवरात्री यात्रेत साबुदाणा फराळ सेवा
  • शिवमहापुराण कथा व देवदर्शन यात्रांसाठी मोफत सेवा व आयोजन

भविष्यातील कार्यदृष्टी

  • स्वच्छ, सुरक्षित आणि संस्कारक्षम मुक्ताईनगरासाठी प्रयत्न
  • महिलांसाठी स्वावलंबन व सुरक्षा उपक्रम
  • तरुणांसाठी रोजगार, शिक्षण व क्रीडा सुविधा
  • सांस्कृतिक वारशाचे संवर्धन करून आदर्श नगरपंचायत निर्माण

📌 (सौ. शितल लक्ष्मण सापधरे)
उमेदवार – प्रभाग १५, नगरपंचायत मुक्ताईनगर

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!