भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममुक्ताईनगर

मुक्ताईनगर येथील पत्रकारांवर जळगाव येथे प्राणघातक हल्ला : पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा नोंद !

मुक्ताईनगर, प्रतिनिधी : मुक्ताईनगर येथील पत्रकार आतील खान यांच्या वरती धुळे येथून मुक्ताईनगरकडे येत असताना अज्ञात इसमाकडून जळगाव येथे प्राणघातक हल्ला करण्यात आला सदरील हल्ल्यात पत्रकार जखमी झाले असून पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुक्ताईनगर येथील वायरल न्यूज चे पत्रकार आतिक बिलाल खान (वय-४७) हे आपल्या मुलासाठी इंजेक्शन आणण्यासाठी धुळे येथे गेले होते. धुळे येथून परतत असताना दि.१० रोज गुरुवारी दुपारी ३: ३० ते ४ वाजेच्या सुमारास जळगाव विद्यापीठ ते गुजराल पेट्रोल पंपाच्या मध्ये त्यांच्या स्विफ्ट गाडी नंबर MH 18 W 6885 या गाडीला मागून ओव्हरटेक करून दोन मोटर सायकल स्वार डबल सीट असे चार लोकांनी शिवीगाळ करून गाडी थांबविण्यास सांगितले तेव्हा गाडी डाव्या बाजूला घेऊन खाली उतरले असता त्यांना विचारणा केली मला का थांबवले असे विचारताच त्यातील एका मोटारसायकलवरील दोघे जणांनी लाथा बुक्क्यांनी तोंडावर, छातीवर मारहान केली खिशातील ६०० रुपये रोख व एक ४०० रुपये किमतीचा बॉलपेन हिसकावून घेतला तसेच त्यातील दोन जण गाडीच्या आजूबाजूने फिरत होती. तेव्हा रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका वयोवृद्ध इसम व जाणारे लोक जमा होऊ लागतात ते चौघे अनोळखी इसम तेथून पळून गेले. त्यांनतर मी मुक्ताईनगर येथे येऊन मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली लागलीच उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक लावंड व पोलिस निरीक्षक रामकृष्ण पवार यांनी फिर्याद घेऊन भारतीय दंड संहिता १८६० चे कलम ३९४, ३४ प्रमाणे चार अनोळखी इसमानविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून CCTNS प्रणालीने शून्य क्रमांकाने वर्ग करण्यात आला आहे

सदर हल्ल्याच्या घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगर येथील पत्रकारांनी पोलीस उपअधिक्षकांची भेट घेऊन हल्ला करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करून कारवाई करण्याची मागणी केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!