भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगरसामाजिक

आज ध्वज पूजनाने होणार मुक्ताई- चांगदेव यात्रेला सुरूवात

मुक्ताईनगर,मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी। श्री क्षेत्र मुक्ताईनगर चांगदेव माघ वारी महाशिवरात्री यात्रा उत्सवाचा आरंभ मंगळवारी दुपारी 1 वा. ध्वज पूजन करून होईल.

योगीराज चांगदेव महाराज व संत मुक्ताई भेटीच्या निमित्ताने दरवर्षी माघ वारी महाशिवरात्रीनिमित्त भव्य यात्रोत्सव संपन्न होत असतो. विदर्भ मराठवाडा खान्देशसह मध्यप्रदेश गुजराथ प्रदेशातून शेकडो दिंड्यासह लाखो वारकरी भाविक या उत्सवात सहभागी होतात .दिनांक 15 ते 20 फेब्रुवारी पर्यंत हा उत्सव चालणार असून आज संत मुक्ताई संस्थांनचे अध्यक्ष भैय्यासाहेब रविंद्र पाटील व विश्वस्तांच्या हस्ते मुक्ताई ध्वज पूजन करून यात्रोत्सवाला विधिवत सुरुवात होणार आहे यावर्षीचा यात्रोसवाचे वैशिष्ट्य कोरोना कालावधीनंतर मागील वर्षी कमी प्रमाणात वारी झाली होती परंतु यावर्षी अत्यंत उत्सवात व प्रचंड संख्येने भाविकांची उपस्थिती राहणार आहे गावागावींच्या दिंड्या पालख्या मुक्ताईनगर कडे मजल दरमजल आगमन करत असून असून दिंड्यामध्ये भावीकांची संख्या सरासरीपेक्षा दुप्पट आहे. यावर्षी दिंड्यांची संख्या सुद्धा वाढणार आहे.

तयारी पूर्ण
यात्रा उत्सव काळात भाविकांना अधिकाधिक सोयीसुविधा पुरवण्यासाठी नगरपंचायत मुक्ताईनगर,ग्रामपंचायत कोथळी,संत मुक्ताई संस्थान कोथळी मुक्ताईनगर हे जय्यत तयारी केली आहे .संपूर्ण परिसरात दिवाबत्ती पाणी आदि व्यवस्था करण्यात आली आहे. व्यापारी मंडळींनी दुकाने थाटण्याची लगबग चालू आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!