मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील व स्वीय सहाय्यक कोरोना पॉझिटिव्ह !
मुक्ताईनगर, प्रतिनिधी : मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील व त्यांचे स्वीय सहाय्यक प्रविण चौधरी यांना कोरोनाची लागण झालीय. स्वत: ट्विट करून यासंदर्भातली माहिती त्यांनी दिलीय. दरम्यान, संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोनाचाचणी करण्याचं आवाहन आ.पाटील यांनी केलंय.
आमदार पाटील यांनी फेसबुकवरून आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती, “मी आणि माझा स्वीय सहाय्यक, आम्हा दोघांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. काळजी करण्याचे कारण नाही पण आमच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी, ही नम्र विनंती. नियम पाळा व काळजी घ्या.”
कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनचा (Omicron) पादुर्भाव वाढत असल्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारकडून खबरदारी घेण्यात येत आहे. त्याचत कोरोनाच्या रूग्णांमध्येही गेल्या काही दिवसांपासून वाढ होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने नवीन नियमावली जाहीर केली आहे. कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी लसीकरण वाढविण्यावर भर देण्यात येत आहे.