भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगरराजकीय

Video|’ईडीची चौकशी राजकीय दबावातून’ एकनाथ खडसेच्या समर्थनार्थ मुक्ताईनगर राष्ट्रवादी तर्फे निषेध

मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।

मुक्ताईनगर, प्रतिनिधी : राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे त्यांच्यासह कुटुंबियांची भोसरी भूखंड प्रकरणी ईडी मार्फत चौकशी सुरू आहे ही कारवाई राजकीय दबावापोटी सूडबुध्दीने करण्यात येत असल्याचा आरोप करत त्याच्या निषेधार्थ मुक्ताईनगर राष्ट्रवादी काँग्रेस मैदानात उतरले असून पक्ष कार्यलय ते तहसील कार्यालय मोर्चा काढून मुक्ताईनगर तहसीलदार यांना निवेदन देऊन हि चौकशी सूडबुद्धीने होत असून या चौकशीचा निषेध व्यक्त करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण महाराष्ट्रात सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना विधिमंडळामध्ये व वर्तमानपत्राच्या माध्यमातून धमक्या देणे सुरू आहे .केंद्रातील सरकारच्या व महाराष्ट्रातील भाजपाच्या नेत्यांच्या विरोधात बोलले की, ईडी ची धमकी दिली जाते. विनाकारण नाहक त्रास देण्याचा प्रयत्न होतोय. ईडी सारख्या स्वायत्त संस्थेचा वापर राजकीय स्वरूपात होतोय. ईडी च्या माध्यमातून असे भासवले जात आहे की ,तुम्ही केंद्र सरकारच्या विरोधात किंवा महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांच्या विरोधात बोलू नका, भ्रष्टाचारावर बोलू नका, सरळ सरळ असे वाटते की ईडी चा वापर भाजपाच्या कार्यालयातून होतोय. या प्रवृत्तीचा आम्ही जाहीर निषेध करीत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते श्री.एकनाथराव खडसे यांना अशाच प्रकारे नाहक त्रास दिला जातोय. वास्तविक पाहता भोसरी येथील जमिनीच्या संदर्भात नाथाभाऊ यांनी वारंवार सांगितले आहे की , ही जमीन एम.आय.डी.सी. ची नाही, सरकारची नाही, कोणत्याही प्रकारची भूसंपादनाची प्रक्रिया झालेली नाही. अथवा मूळ मालकाला जमिनी बाबतचा मोबदला सुद्धा दिलेला नाही .ही जागा एमआयडीसीचा ताब्यात नाही .त्यामुळे हा व्यवहार संपूर्णपणे खाजगी स्वरुपाचा आहे .सरकारचे या व्यवहारामुळे काहीही नुकसान झालेले नाही. हा व्यवहार सौ.मंदाकिनी खडसे व गिरीश चौधरी यांच्या नावाने असून तो अधिकृत आहे. त्यासाठी लागणारी स्टॅम्प ड्युटी सुद्धा रीतसर भरलेली आहे. श्री.एकनाथ खडसे यांचा या व्यवहाराशी कोणताही संबंध नाही त्यांच्या नावाने व्यवहार झालेला नाही. असे असताना जाणीवपूर्वक ईडी कडून त्यांना बोलावण्याचा प्रश्न च काय ? वास्तविक पाहता या प्रकरणाचे 2016 पासून पाच वेळा चौकशी झालेली आहे. न्यायमूर्ती झोटिंग कमेटी, बंडगार्डन पोलीस स्टेशन पुणे, आयकर विभाग, अँटी करप्शन ब्युरो (ACB)कडून चौकशी होऊन एसीबी मार्फत क्लोजर रिपोर्ट पुणे कोर्टात सादर करण्यात आलेला आहे. या चौकशीत कोणतेही तथ्य आढळलेले नाही. परंतु श्री.एकनाथराव खडसे यांनी भाजपा सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि तात्काळ ईडी कडून चौकशी सुरू झाली. यामध्ये राजकीय वास असल्याचे दिसून येते. यापूर्वी अनेक वेळ चौकशा होऊन सुद्धा पुन्हा ईडी ची चौकशी होते याचा अर्थ असा निघतो की, राजकीय दबावातून ईडी कार्य करीत आहे. भाजपच्या एकाही नेत्याची ईडीकडून चौकशी का नाही ? असा प्रश्न निर्माण होतो. आणि म्हणून या प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो. खडसे कुटुंबीयांना ज्या पद्धतीने छळले जातेय त्याचा आम्ही धिक्कार करतो. श्री.एकनाथराव खडसे आणि त्यांच्या कुटुंबियांना खोट्या भोसरी जमीन प्रकरणात मुद्दाम गोवण्याचा प्रयत्न होत आहे. असा आमचा आरोप आहे. सदर प्रकार तात्काळ थांबवून त्यांचा मानसिक छळ थांबवावा. अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू.अशा आशयाचे निवेदन देण्यात आले

यावेळी बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, विधानसभा क्षेत्र प्रमुख विजय सोनार,तालुका अध्यक्ष यु डी पाटील, प स सभापती सुवर्णा ताई साळुंखे, प्रवक्ता सेल रावेर लोकसभा प्रमुख विशाल महाराज खोले, युवक जिल्हा उपाध्यक्ष पवनराजे पाटील,माजी प स सभापती विलास धायडे, दशरथ कांडेलकर, राजेंद्र माळी, सोशियल मीडिया जिल्हा अध्यक्ष शिवराज पाटील, राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष शाहीद खान, राष्ट्रवादी महिला आघाडी तालुका अध्यक्ष रंजना ताई कांडेलकर,राष्ट्रवादी महिला आघाडी शहराध्यक्ष निता ताई पाटील,नंदाताई निकम, किशोर चौधरी,माफदा तालुका अध्यक्ष रामभाऊ पाटील, राष्ट्रवादी मागासवर्गीय सेल तालुका अध्यक्ष नंदकिशोर हिरोळे, सरचिटणीस रवींद्र दांडगे,कल्याण पाटील,
डॉ बि सी महाजन,भागवत पाटील,चंद्रकांत बढे, लिलाधार पाटील आदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!