भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगर

मुळ मुक्ताई मंदिराचे रखडलेले बांधकाम १५ दिवसात मार्गी लावणार– आ.चंद्रकांत पाटील

मुक्ताईनगर, प्रतिनिधी : आदिशक्ती मुक्ताबाई अंतर्धान समाधीस्थळ कोथळी येथील मुळमंदिराचे दहा महिन्यांपासून रखडलेले बांधकाम पंधरा दिवसांत मार्गी लावून येत्या 725 व्या समाधी सोहळ्या पर्यंत पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करतो असे आश्वासन मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी वारकरी भाविकांना दिले.ते महाशिवरात्री निमित्ताने चांगदेव – मुक्ताबाई यांचे महापुजा अभिषेकानंतर बोलत होते.

तत्पूर्वी आज भल्या पहाटे आ. चंद्रकांत पाटील यांनी तापी पयोष्णी संगमावर योगीराज चांगदेव महाराज यांची महापुजा केली.संत मुक्ताबाई संस्थान कोथळी-मुक्ताईनगर मानकरी भैय्यासाहेब रविंद्र पाटील यांनी दुग्धाभिषेक व पंचामृत पुजा आरती केली.त्यावेळी पंजाबराव पाटील,अंकूश चौधरी,पंकज कोळी, पुरूषोत्तम वंजारी,विशाल सापधरे हजर होते. तेथून मुळ मुक्ताबाई समाधीस्थळ कोथळी येथे सौ.यामीनिताई व आ.चंद्रकांत पाटील यांनी सपत्नीक आई मुक्ताई महाअभिषेक पूजन करून आरती केली.

यावेळी उपस्थित वारकऱ्यांशी संवाद साधला . राज्यात आधी संतांचे संस्थेचे, महापुरुषांच्या शताब्दी महोत्सव वर्ष साजरे केले तेथे सरकारने विशेष पॅकेज देवून कामे केली.मात्र यंदा आई मुक्ताबाई सप्तशतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षात निधीअभावी 10 महीन्यापासून बांधकाम बंद पडले आहे. निदान येत्या 25मे पर्यंत तरी पुर्ण व्हावे अशी रास्त अपेक्षा वारकऱ्यांनी व्यक्त केली.यावेळी मंदिर व्यवस्थापक उद्धव महाराज जुनारे, विश्वंभर महाराज तीजारे, ज्ञानेश्वर गावंडे,लक्ष्मण सावळे,रतिराम शास्त्री, बळीराम चोपडे,अमोल महाराज, भावराव महाराज लखन महाराज पाटील पुरूषोत्तम वंजारीआदी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!