मुक्ताईनगर येथील भर चौकातील गजानन ज्वेलर्स फोडण्याचा चोरट्यांचा अयशस्वी प्रयत्न
मुक्ताईनगर,मंडे टू मंडे न्युज. प्रतिनिधी.अक्षय काठोके l मुक्ताईनगर येथील भर चौकातील प्रवर्तन चौक येथील गजानन ज्वेलर्स फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न अयशस्वी झाला असून सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तोंड बाधून काळे कपडे घातलेले तीन चोरटे कैद झाले, पोलीस गस्त वाढविण्याची नागरिकांनी मागणी केली आहे.
याबाबत अधिकृत असे की मुक्ताईनगर येथील प्रवर्तन चौकातील भर वस्तीत असलेले गजानन ज्वेलर्स फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न आज रात्री २ ते २.१५ वाजेच्या सुमारास चोरट्यांकडून झाला तोंडावर मास लावलेल्या तीन चोरट्यांनी शटर उचकावून ज्वेलर्स मध्ये प्रवेश केला परंतु दागिने तिजोरी मध्ये असल्यामुळे तिजोरी फोडता आली नाही त्यामुळे चोरट्यांच्या हाती काही लागले नाही असे ज्वेलर्सचे मालक गजानन सुरपाटणे यांनी सांगितले परंतु भर चौकात घडलेल्या घटनेमुळे नागरिक धास्तावले असून पोलीस गस्त असते की नाही? आणि जर गस्त असते तर ही घटना घडली कशी? अशी शंका नागरिक विचारू लागले आहेत