भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगर

भोगवटा व अतिक्रमण धारकाना हक्काचे घर मिळणार, आ. चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्याने सर्व्हेक्षण सुरु

मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी : मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीत गावठाण त्याचप्रमाणे नगरपंचायत मालकीच्या जागेवर अतिक्रमण करून राहणाऱ्या 2011 पूर्वीच्या नागरिकांना दिलासादायक बातमी आहे नगर पंचायत हद्दीत अतिक्रमीत जागांवर राहणाऱ्या सुमारे २५०० नागरिकांना यामुळे हक्काचे घरकुल मिळणार असून त्यांच्या अतिक्रमित जागा ह्या नियमाकुल होणार आहेत यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश आले असून नगरपंचायती द्वारा अधिकृतरित्या प्रभाग क्रमांक 14 मधून सर्वेक्षणात सुरुवात झालेली आहे

नगरपंचायत हद्दीत अतिक्रमण व भोगवटा धारक नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुल व तत्सम योजनेचा लाभ मिळू शकत नसल्याने शहरातील सुमारे २५०० च्या जवळपास वर भोगवटादार असलेल्या नागरिकांना या योजनेपासून वंचित राहावे लागत होते. ही मोठी अडचण लक्षात घेता आमदार चंद्रकांत पाटील यांनी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील ,जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याशी चर्चा करून मुक्ताईनगर तहसीलदार यांच्या दालनात तहसीलदार व मुख्याधिकारी यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली होती व शहरातील अतिक्रमित धारकांच्या जागा नियमाकुल करण्यासंदर्भात ठराव व इतर कागदोपत्री सोपस्कार पार पाडण्याच्या सूचना केल्या होत्या

त्यानुसार पुढच्या पालिकेचा मीटिंगमध्ये तहसीलदारांच्या पत्रानुसार शहरातील अतिक्रमित जागा निर्माण करण्यासंदर्भात चा ठराव घेण्यात आला व तद्नंतर या संदर्भातील निविदा प्रक्रिया पार पाडून दि.१७ मार्च २०२२ रोजी युनिटी जिओ स्पेटीएल एल.एल.पी, कोथरूड पुणे या एजंसीला शहरातील अतिक्रमण धारक नागरिकांचे सर्वेक्षण करण्यासाठी नगरपंचायत मुख्याधिकारी अश्विनी गायकवाड यांच्या स्वाक्षरीने कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. सदरील एजंसीने मंगळवार दि.१० मे २०२२ पासून प्रभाग क्र.१४ मधील खर्डी परिसरात नगरसेविका तथा महिला व बालकल्याण सभापती सविता सुभाष भलभले, युनिटी जिओ स्पेटीएल एल.एल.पी, कोथरूड पुणे एजंसीचे लिंबराज सूर्यवंशी, मिलिंद देवधर, जयवंत पाठक आदीद्वारा सर्वेक्षण सर्वेक्षणास सुरुवात केली आहे. यानंतर शहरातील इतर ठिकाणचे सर्वेक्षण टप्प्याटप्प्याने होणार असून शहरातील भोगवटा धारक नागरीकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

कार्यारंभ आदेशात म्हटले आहे की,
मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या हद्दीतील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत नियमानुकूल करण्यासाठी शासकीय अतिक्रमित जमिनीचे अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे सर्वेक्षण करून भौगोलिक माहिती प्रणाली आधारे GIS नकाशे तयार करणे, तसेच अतिक्रमित क्षेत्रांचा अभिन्यास तयार करणे व नगर रचना विभागाद्वारे प्रमाणित करून नगर पंचायतीकडे सादर करणे. नियमानुकूल झालेले तसेच इतर लाभार्थीचे प्रधान मंत्री आवास योजने अंतर्गत प्रकल्प व्यवस्थापन करणे. असे काम युनिटी जिओ स्पेटीएल एल.एल.पी, कोथरूड पुणे एजंसीला देण्यात आले आहे. संपूर्ण सर्व्हेक्षण झालेनंतर जिल्हा नियोजन समिती मार्फत जागा मोजणीची रक्कम पालिकेला उपलब्ध केली जाईल व पुढे त्या जागांचे सी टी सर्वे नकाशे व उतारे केली जातील अशी माहिती आमदार चंद्रकांत पाटील यांचे स्विय्य सहाय्यक प्रवीण चौधरी यांनी मंडे टू मंडे न्यूज दिली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!