सद्गुरू दिगंबर महाराज चिनावलकर दिंडी सप्ताहाची सांगता
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे वृत्तसेवा। आदिशक्ती संत मुक्ताबाई समाधीस्थळ कोथळी मुक्ताईनगर जुने मंदीरात संत मुक्ताबाई समाधी सप्तशतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व नामसंकीर्तन सोहळ्यात सांगता प्रसंगी आई मुक्ताई केळी सफरचंद मोसंबी टरबुज व फुलांची सजावट करण्यासाठी ७२५ व्या अंतर्धान समाधी सोहळ्यानिमित्त ७२५ कीलो फळे व फुले वापरून नयनरम्य आरास प्रथमच करण्यात आला.
यंदाचे संत मुक्ताबाई समाधी घेवून ७२५ वे वर्षे होत असल्याने संत मुक्ताबाई समाधीस्थळी वर्षभर हरिनामाचा गजर होत आहे.त्यापैकी सद्गुरू दिगंबर महाराज चिनावलकर दिंडी परंपरा व मठ संस्था पंढरपूर यांनी आठ दिवस नामसंकीर्तन सोहळा संपन्न झाला ह.भ.प.रविद्र महाराज हरणे यांचे काल्याचे कीर्तन झाले. तत्पूर्वी पहाटे नरेंद्र नारखेडे व सौ. सिमा नारखेडे यांनी सपत्नीक आई मुक्ताबाई महाअभिषेक पूजा आरती केली . सप्तशतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त मुक्ताबाईस केळीखांब,कंबळ,हिरवी पीवळी केळी, सफरचंद,मोसंबी,नारळ,टरबुज आदि फळे व जरबेरा,झेंडू, शेवंती आंब्याच्या तोरण ईत्यादी ७२५ कीलो फळेफुलांनी आकर्षक गाभारा सजविण्यात आला. हभप. रविंद्र महाराज हरणे यांचे काल्याचे कीर्तन झाले .मंदीर दिंडीपरिक्रमा करून दहीहंडी फोडण्यात आली. कार्यक्रमात महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांनी आशिर्वचन दिले.संत मुक्ताबाई संस्थान अध्यक्ष रवींद्र पाटील यांनी गादीपती दुर्गादास महाराज नेहते, नरेंद्र नारखेडेअध्यक्ष, घनश्याम पाटील चिनावल उपाध्यक्ष,विजय महाजन रोझोदा,कीशोर बोरोले, त्र्यंबक चौधरी सांगवी, विजय ढाके,अट्रावल,या विश्वस्ताना सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले..झेंडूजी महाराज बेळीकर मठाचे अध्यक्ष रमाकांत भारंबे,विजय राणे,यांचा सत्कार करण्यात आला. संत मुक्ताबाई फडावरील महाराज कीर्तनकार प्रवचनकार मंडळीसह भाविक उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी भास्कर बोंडे न्हावी , पांडूरंग पाटील व भजनी मंडळ कळमोदा, सांगवी ,रोझोदा यांनी परिश्रम घेतले.