भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगर

तत्काळ पंचनामे करून नुकसान ग्रस्तांना नुकसान भरपाई द्या – मुक्ताईनगर शिवसेनेची मागणी

मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | दि. १७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ३ ते ४ वाजेच्या सुमारास अतिवृष्टी मुळे मुक्ताईनगर शहरात झालेल्या घरांच्या पडझड व इतर नुकसानीचे पंचनामे करून संबंधितांना तात्काळ नुकसान भरपाई मिळणे साठी मुक्ताईनगर शिवसेने कडून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, दि.१७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ३ ते ४ वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीसदृश्य पाउस पडला. यामुळे मुक्ताईनगर शहरातील अनेक भागात घरांची पडझड व नागरिकांचे इतर नुकसान देखील प्रचंड प्रमाणात झालेले आहे. तरी सदरील नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून संबंधितांना तात्काळ नुकसान भरपाई मिळण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात यावा.

असे निवेदन शिवसेना शहर प्रमुख गणेश टोंगे, शिवसेना जिल्हा समन्वयक आरिफ आझाद, शहर संघटक वसंत भलभले, सोशल मीडिया तालुकाप्रमुख पप्पू मराठी, संतोष माळी, राजेंद्र तळले, दीपक कोळी, नगरसेवक पियुष महाजन, आदींनी दिले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!