आम्ही आ.चंद्रकांत पाटील व ना. गुलाबराव पाटील यांच्या सोबत, मुक्ताईनगरात पदाधिकाऱ्यांचे समर्थ !
मुक्ताईनगर,मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी : राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदेसह आमदारांनी बंड पुकारल्यानंतर खळबळ उडाली असतांना तालुक्यातील पदाधिकारी यांनी आ.चंद्रकांत पाटील यांच्या सोबत आम्ही असल्याचे सांगत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यात संघटनेची जोरदार बांधणी केली असून आ. चंद्रकांत पाटील यांनी मतदारसंघात उत्तम कार्य करत आहे त्यांना आमचा पाठींबा असल्याचे सांगत त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत मुक्ताईनगर तालुका पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
- सोळा वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी, कोणत्या देशाने केले फर्मान
- महायुतीचे उमेदवार अमोल जावळे यांना रावेर तालुक्यात जोरदार प्रतिसाद,जावळेंना निवडून आणण्याचा मतदारांचा निर्धार
- रावेर तालुक्यात २२ लाखांचा गुटखा जप्त, गुटखा तस्करांमध्ये खळबळ
आमदार चंद्रकांत पाटलांनी खेड्यापाड्यात जाऊन शाखेसाठी काम केले असल्याचे सांगत ते आमच्यासाठी सर्वस्व असून ते जे निर्णय घेतील त्या निर्णयाला आमचा पाठिंबा असेल ना.गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात ४ आमदार निवडून आले असून पालकमंत्री आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी घेतलेल्या निर्णयाचं आम्ही स्वागत करत असून त्यांना आमचा पाठींबा असल्याने आ.पाटील सांगतिल तीच आमची दिशा राहील असे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
महाविकास आघाडी संदर्भात बोलतांना त्यानी रोष व्यक्त केला आघाडीच्या सरकारमध्ये काही विरोधक आहेत त्यांनी तालुका प्रमुखावर, शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुखांवर, सरपंचांवर गुन्हा दाखल केला. ही केवळ आजची परिस्थिती नाही तर नेहमी आमच्यावर सतत अन्याय अत्याचार होत आहे. महाविकास आघाडीचे सरकार असून आमदारांची काम होत नसेल तर नाराजी साहजिक आहे. आम्ही खूप वेळा मातोश्री मुख्यमंत्री यांच्याकडे दाद मागितली. वरिष्ठ नेत्यांकडे दाद मागितली मात्र उत्तर आले नाही किंवा आम्हाला न्याय मिळाला नसल्याचे त्यांनी यावेळी बोलून दाखविले. यावेळी तालुका प्रमुख छोटू भोई, उप तालुका प्रमुख नवनीत पाटील, अल्पसंख्याक संघटक अफसर खान व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.