मुक्ताईनगरात भटक्या कुत्र्यांचा हौदोस : १० बकऱ्या केल्या ठार काही जखमी, नगरपंचायतिचा नियोजन शुन्य कारभार !
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा प्रतिनिधी : शहरात भटक्या कुत्र्यांचा धुमाकुळ वाढला असून पाळीव प्राण्यांवर हल्ला चढवित ठार करण्याचा धक्कादायक घटना घडत आहे यामुळे नागरिकांनामध्ये भीतीचे वातावरण पसरले असून नगरपंचायतीच्या ढिसाळ कारभारामुळे गेल्या तीन दिवसांमध्ये १० शेळ्यांनी जीव गमावला असल्याचा आरोप होत आहे.
शहरात भटक्या कुत्र्यांनी दहशत निर्माण केली असून नागरिक रात्रीचे १० वाजल्यानंतर बाहेर पडू शकत नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुक्ताईनगर शहरातील प्रभाग क्रमांक ११ येथील शेख असिफ मिस्तरी व आरिफ शेख यांच्या पाळीव ६ शेळ्या यांच्यावर रात्री हल्ला चढवत ठार केल्या तर चार बकऱ्या जखमी केल्या यापूर्वी दोन दिवस आधी सुद्धा चार बकऱ्यांना कुत्र्यांनी हल्ला चढवून ठार केले होते याप्रकाराने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून या नगरपंचायत प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे पाळीव प्राण्यांचे प्राण गमवावे लागत असल्याचे घटना समोर येत आहे. भटक्या कुत्र्यांचा ताबडतोब नगरपंचायतीने बंदोबस्त करावा अशी मागणी मुक्ताईनगर वासीय करीत आहे.
रात्री १० नंतर अघोषित संचारबंदी? शहरात भटक्या कुत्र्यांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याने, कुत्राचा हल्ल्याच्या घटनेत वाढ झाली. सद्यःस्थितीत अनेक महिला आणि लहान मुलांना भटक्या कुत्र्यांमुळे असुरक्षित वाटते. पहाटे, सकाळी कामाला किंवा शिक्षणासाठी पायी अथवा दुचाकींवर घराबाहेर जाणाऱ्या नागरिकांच्या मनात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याची धास्ती असते. कुत्र्यांच्या भीतीने लहान मुलांसह नागरिक रात्रीचे १० नंतर घरा बाहेर पडण्यास भीत आहेत, एवढी दहशत भटक्या कुत्र्याची शहरात निर्माण झाली असून नगरपंचायत प्रशासनाने भटक्या कुत्र्याचा तातडीने बंदोबस्त करावी. अशा मागणीने शहरात जोर धरला आहे.
शहरात अनेक व्याधींनी त्रस्त भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढू लागला आहे. कचरा डेपो, कचरा कुंडी, हॉटेल, भाजीमंडई परिसराच्या आसपास किमान डझनभर कुत्री भटकत असतात. येथून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या अंगावर ही भटकी कुत्री धावून जातात. या कुत्र्यांच्या हल्ल्यात काही जण जखमीही झाले होते. भटकी कुत्री असुरक्षिततेचे कारण होत असतील, तर त्यावर उपाय शोधायला हवा. नगरपंचायतीच्या आरोग्य विभागाचे मात्र, यावर नियोजन शून्य असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.