भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यमहाराष्ट्र

महाराष्ट्रात पुन्हा कडक निर्बंध ? येत्या दोन दिवसांत निर्णय

Monday To Monday NewsNetwork।

मुंबई(वृत्तसंस्था)। डेल्टा प्लस विषाणूचा धोका पाहून राज्यात पुन्हा कडक निर्बंध लावण्यात येणार आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार, दोन दिवसांत राज्यातील निर्बंध आणखी कडक करण्यात येणार आहेत. काही जिल्ह्यांतील कोरोना रुग्णांच्या संख्येत झालेली वाढ आणि बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी यांमुळे राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी झाल्याचं समजते. आत्यवशक सेवा वगळता इतर दुकानांच्या वेळा पुन्हा कमी करण्यात येणार असल्याचं सुत्रांनी सांगितलं.

राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचे 21 रुग्ण आहेत. केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला धोक्याचा इशारा दिला आहे. डेल्टा प्लस व्हेरियंटच्या रुग्णांमध्ये आणखी वाढ होऊ नये. तसेच डेल्टा प्लस व्हेरियंट तिसऱ्या लाटेला आमंत्रण देऊ शकतो, हा धोका ओळखून राज्य सरकार निर्बंध कडक करण्याच्या तयारीत असल्याचं समजतेय. राज्यातील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय 20 दिवसांपूर्वी घेण्यात आला होता. पण निर्बंध शिथिल केल्यापासून कोरोनाबाधितांच्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यातच डेल्टा प्लस व्हेरियंटचे विषाणू आढळल्यामुळे राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्याबाबत मंत्रिडळाच्या बैठकीत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले

कोरोना रुग्णांचे साप्ताहिक प्रमाण आणि ऑक्सिजन बेडची व्याप्ती.. या दोन निकषांच्या आधारे राज्यातील जिल्ह्यांची पाच लेव्हलमध्ये विभागणी करण्यात आली होती. दर आठवड्याला परिस्थितीनुसार निर्बंध कमी -जास्त प्रमाणात लागू करण्याचे धोरण सध्या राज्यात आहे. सध्याच्या निर्बंध शिथिलीकरणाच्या पंचस्तरीय पद्धतीत बदल करण्यात येणार असून हे निकष अधिक कठोर करण्यात येणार आहेत. गर्दी टाळण्यासाठी नियम अधिक कठोर करून अत्यावश्यक वगळता इतर दुकानांच्या वेळाही कमी करण्यात येण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ!
गेल्या काही दिवसांपासून १० हजारांच्या खाली गेलेली कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसभरातील संख्येत बुधवारी काही प्रमाणात वाढ झाली. त्यानुसार, दिवसभरात १०,०६६ कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर १६३ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्याच्या आरोग्यविभागानं ही माहिती दिली.

महाराष्ट्रासह केरळला केंद्राचा इशारा –
कोरोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरिंटचे देशात 40 रुग्ण आढळले आहेत. यापैकी महाराष्ट्रातील सात जिल्ह्यात 21 रुग्ण आहेत. महाराष्ट्रशिवाय केरळ आणि मध्य प्रदेशमध्येही नव्या व्हेरियंटचे रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्र आणि केरळला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने धोक्याचा इशारा दिला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!