महाराष्ट्र

आणखी एका एसटी कर्मचाऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुंबई, वृत्तसंस्था। राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु असून आता आणखी एका कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घजली आहे. चंद्रपूरमध्ये एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केली आहे. शहारतील प्रमुख आगारामध्ये वाहतूक नियंत्रक म्हणून काम करणाऱ्या सत्यजित ठाकूर यांनी विष प्राशन करून जीवन संपवलं आहे. त्यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी संप पुकारला असतानाच आत्महत्येच्या या घटनेनं संताप व्यक्त केला जात आहे. याआधी अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. य़ाआधीच्या संपावेळीसुद्धा एका कर्मचाऱ्याने एसटीला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली होती.
आत्महत्या केलेला कर्मचारी सत्यजित ठाकूर हा ३४ वर्षांचा होता आणि चारच महिन्यांची मुलगी आहे. त्यांची पत्नी नागपूरला राहते. दोनच दिवसांपूर्वी ते ब्रह्मपुरीला आले होते. त्यांचा फोन स्वीच ऑफ लागल्यानंतर पत्नीला शंका आली. त्यानंतर पत्नीने त्यांच्या सहकाऱ्यांना कॉल केले. तेव्हा सहकाऱ्यांनी घरी जाऊन पाहिले असता हा प्रकार समोर आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!