भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

ताज्या बातम्यामहाराष्ट्र

उत्तर व मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पुढील ४८ तास थंडीची लाट कायम, हवामान खात्याचा अंदाज

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुंबई,वृत्तसंस्था। पुढील ४८ तासांमध्ये उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राने व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडणार असल्याचाही अंदाज देखील हवामान केंद्राने व्यक्त केला आहे.

प्रादेशिक हवामान केंद्राने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, नाशिक, जळगाव आणि औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेडमध्ये थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. तर फेब्रुवारीतील पहिल्या आठवड्यात राज्यात विविध ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील पडू शकतो. मात्र, फेब्रुवारीच्या दुसर्‍या आठवड्यापासून राज्यातील थंडीचा जोर कमी होईल, असा अंदाज हवामान केंद्राने वर्तवला आहे.

मुंबईत रविवारी कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १८ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले आहे. तसेच पुण्यात कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १२ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. याबरोबरच, नागपूरमध्ये कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान ११ अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!