” स्वबळावर लढू ” स्वबळाची भाषा मी केली तर त्रास होतो-नाना पटोले
Monday To Monday NewsNetwork।
मुंबई(वृत्तसंस्था)। स्वबळाच्या घोषणेमुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकली आहे, असं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. नाना पटोले यांनी पुन्हा एकदा स्वबळाचा नारा दिला असून लोणावळा येथील कार्यक्रमात कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिलेत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्यावर पाळत ठेवत असल्याचा आरोपही यावेळी पटोले यांनी केला.
सोनिया गांधी यांनी सांगितलेय आहे की, महाराष्ट्र काँग्रेसची भूमी आहे. आपल्याला तिथं सत्ता आणायची आहे. मी त्यांना आश्वासन देऊन आलो आहे. परंतु मला हे सुखानं जगू देणार नाहीत. त्यांच्याकडे गृहखातं आहे मुख्यमंत्रिपद आहे. ते सत्तेत आपल्याबरोबर आहेत. परंतु ते त्यांच्या जवळ आहेत. महाराष्ट्रात काँग्रेस उभी राहतेय, हे त्यांना माहित आहे. आता मी इथं आहे याचा रिपोर्ट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना देण्याचा आदेश आहे. मी कुठं सभा घेतली, कुठले दौरे केली याची सगळी माहिती असते, असं पेटोले म्हणाले आहेत.
“स्वबळावर लढू”असे स्पष्ट करत स्वबळाची भाषा मी केली तर त्रास होतो, आणि ‘ते’ बोलले तर ठीक, असा अप्रत्यक्ष टोला शिवसेनेला लगावत कार्यकर्त्यांनी कामाला लागावे,’’ असे आवाहन नाना पटोले यांनी केलं आहे. नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधला. तसेच लोणावळामधील चिक्की ही फार प्रसिद्ध आहे. मात्र, फडणवीस सरकारने या ‘चिक्कीला’ फेमस केले. पण, आता या ‘चिक्की’ चे काय हाल चालू आहे ते बघा, असा टोला त्यांनी पंकजा मुंडे यांना लगावला.
‘‘कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना त्रास होत असेल, कामे होत नसतील तर या त्रासाला तुम्ही आपली ताकद बनवा,’’ असे पटोले म्हणाले. आपला पक्ष मोठा करणे, पुढे नेणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. व्यवस्थेच्या विरोधात लोकांचा उद्रेक आहे. तो मला माहिती आहे. कुणाकडे लक्ष देण्याची गरज नाही, आपण आपल्या घराकडे लक्ष द्या, घर मजबूत करा, असा सल्ला यावेळी पटोले यांनी कार्यकर्त्यांना दिला. बारामतीमध्ये काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे. तिथे मला प्लॅनिंग करावे लागेल. मोठ्या जहाजांना लवकर बुडण्याची भीती असते. लहान होडी इकडून तिकडे लवकर निघून जाते. माझा इशारा तुम्ही समजून घ्या. बारामतीसाठी मला प्लॅनिंग करावे लागेल, असा खोचक टोला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता लगावला.