भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

आधी व्हीप,आता थेट कॉल, अधिवेशनापूर्वी महाविकास आघाडीच्या हालचाली वाढल्या

Monday To Monday NewsNetwork।

मुंबई ( वृत्तसंस्था)। येत्या पाच आणि सहा जुलैला महाराष्ट्र विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन होत आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांनी काटेकोर नियोजन केल्याचं दिसतंय. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आपआपल्या आमदारांना व्हिप बजावला आहे. या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. या निवडीवेळी दगाफटका होऊ नये, यासाठी महाविकास आघाडीकडून सावध पावलं टाकली जात आहेत. त्यासाठी तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी आपआपल्या आमदारांना फोन करुनही अधिवेशनाला हजर राहण्यासाठी बजावलं आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांनी सर्व आमदारांना संपर्क सुरु केला आहे. तीन पक्षाचे प्रमुख नेत्यांनी महाविकास आघाडीच्या आमदारांना फोन करुन संपर्क साधला. अधिवेशन कालावधीत विधानसभा अध्यक्ष निवडणूक या विषयाबरोबरच पुरवणी मागण्या, विधेयकं मंजुरी यासाठी सभागृहात बहुमत रहावे यासाठी आमदारांशी संपर्क सुरु आहे. दोन दिवसांचं अधिवेशन
कोरोना संकटाची सध्याची स्थिती पाहता आणि तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन मुंबई येथे होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी 5 व 6 जुलै या दोन दिवसाचे कामकाज निश्चित करण्यात आले आहे.कोरोना विषाणूचा संसर्ग होवू नये म्हणून विधानभवनात अधिवेशन कालावधीमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व मान्यवरांना, अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी यांच्याकरिता लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेले असले तरी अधिवेशन कालावधीत विधानभवन परिसर प्रवेशाकरिता सर्वांना RT-PCR कोरोना चाचणी सक्तीची करण्यात आली आहे.यासाठी विधानभवन, मुंबई येथे शनिवार व रविवारी दि. 3 व 4 जुलै, 2021 रोजी RT-PCR कोरोना चाचणीसंदर्भात व्यवस्था करण्यात येणार आहे.

विधानसभा अध्यक्ष निवडणूक
बाळासाहेब थोरात यांनी बोलताना, “विधानसभा अध्यक्षांची निवड याच अधिवेशनात होणार आहे आणि तो अध्यक्ष काँग्रेसचा असेल. हे सरकार भक्कम आहे. दोन वर्षे सरकार चाललं आहे, पुढच्या काळातही सरकार चांगल्या पद्धतीने चालेल, महाविकास आघाडीमध्ये मतभेद नाहीत” असं सांगितलं होतं.
नाना पटोले यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने विधानसभा अध्यक्षपद रिक्त आहे. मात्र विधानसभा अध्यक्षपद इतक्या अधिवेशनानंतरही रिक्त ठेवणे हे असंविधानिक असल्याचं म्हणत, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली होती. राज्यपालांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्याबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
संग्राम थोपटे यांचं नाव चर्चेत
काँग्रेसकडून विधानसभा अध्यक्षपदासाठी काही नावं शर्यतीत आहेत. यामध्ये सर्वात आघाडीवर असलेलं नाव म्हणजे संग्राम थोपटे. संग्राम थोपटे हे पुण्यातील भोर मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार आहेत. थोपटे आतापर्यंत भोर मतदारसंघातून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. महाविकास आघाडीचे संख्याबळ
शिवसेना – 56
राष्ट्रवादी – 53
काँग्रेस – 43
तिन्ही पक्षांचे मिळून – 152 महाविकास आघाडीला पाठिंबा असलेले पक्ष
बहुजन विकास आघाडी – 3
समाजवादी पार्टी – 2
प्रहार जनशक्ती पार्टी – 2
माकप – 1
शेकाप – 1
स्वाभिमानी पक्ष – 1
क्रांतिकारी शेतकरी पार्टी – 1
163
अपक्ष – 8
171
विरोधकांकडे असलेले संख्याबळ
भाजप – 106
जनसुराज्य शक्ती – 1
राष्ट्रीय समाज पक्ष – 1
अपक्ष – 5
एकूण – 113
तटस्थ
महाराष्ट्र नवनिर्माण सेना – 1
एमआयएम – 2

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!