माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात ईडी कोर्टात
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई ,वृत्तसंस्था। समन्स बजावूनही ईडी समोर उपस्थित न झाल्याने ईडीने अनिल देशमुख यांच्या विरोधात कोर्टात धाव घेतली शुक्रवारी विशेष न्यायालयात ईडीने देशमुखांच्या विरोधात तक्रार अर्ज दाखल केला.
आयपीसीच्या कलम 174 अन्वये ही तक्रार दाखल करण्यात आली असून या कलमा अंतर्गत एक महिन्याच्या साध्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. ईडीने अनिल देशमुख यांच्यावर अनेक वेळा समन्स जारी केली . पण समन्स देशमुख यांनी जुमानली नाहीत व ते हजर राहिले नाहीत अशी ईडीची तक्रार आहे.
मनि लॉंड्रिंगच्या आरोपात देशमुखांचे दोन सहकारी, संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांना ईडीने या आधीच अटक केली असून ते सध्या तुरूंगात आहेत. या दोघांच्या विरोधात ईडीने आरोपपत्रही दाखल केले आहे. तथापि या आरोपपत्रात अनिल देशमुख किंवा त्यांच्या कुटुंबियांपैकी कोणाचेही नाव नाही.