भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

नव्या वर्षात “या” दिवशी बंद राहणार दारूची दुकाने

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुंबई,वृत्तसंस्था। अवघ्या काही दिवसांत यंदाचे २०२१ हे वर्ष सरुन २०२२ ला सुरुवात होणार आहे.लवकरच नव्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी पार्ट्यांची जय्यत तयारी सुरु झाली आहे. या पार्ट्यांमध्ये तळीरामांना मात्र दारुचा आस्वाद घेतल्याशिवाय त्यांच्या पार्टीला फुलस्टॉप लागत नाही.याशिवाय, अनेकजण रोजचा ‘एकच प्याला’ सुद्धा लागत असतो. भारतातील वेगवेगळ्या राज्यात मद्यप्रेमींसाठी वेगवेगळे नियम आहेत.काही ठिकाणी दारु पिण्यावर सक्त मनाई केली जाते. तर काही ठिकाणी सुट देण्यात येते. प्रत्येक ठिकाणी दारुवर बऱ्याच प्रमाणात शुल्क आकारले जातात. याशिवाय काही ठिकाणी दारुची दुकाने उघडण्यासाठी वेगवेगळ्या वेळा आहेत. काही विशिष्ट दिवशी दारुची दुकाने ही बंद असतात, त्याला ड्राय डे म्हटले जाते. या ड्राय डेच्या दिवशी दारु विक्रेत्यांना दारुची दुकाने बंदच ठेवावी लागतात. दुकानदारांनी तसे न केल्यास त्यांना दंड भरावे लागते. २०२२ या वर्षात एकूण २१ ड्राय डे असणार आहेत.त्यामुळे तळीरामांनो ही बातमी तुमच्यासाठी आहे.

जानेवारीपासून ३१ डिसेंबर पर्यंत कोणत्या दिवशी ड्राय डे असणार ते जाणून घ्या.
२०२२ मधील या दिवशी असणार ‘ड्राय डे’
१४ जानेवारी – मकरसंक्रांत
२६ जानेवारी – प्रजासत्ताक दिन
३० जानेवारी – शहीद दिन
१६ फेब्रुवारी -गुरु रविदास जयंती
१९ फेब्रुवारी – छत्रपती शिवाजी महाराज जयंती
२६ फेब्रुवारी – स्वामी दयानंद सरस्वती जयंती
१ मार्च – महाशिवरात्री
१८ मार्च – होळी
१४ एप्रिल – डॉ.आंबेडकर जयंती आणि महावीर जयंती
१५ एप्रिल – गुड फ्रायडे
१ मे – महाराष्ट्र दिन
३ मे – ईद
१० जुलै – बकरी ईद
१५ ऑगस्ट – स्वातंत्र्य दिन
१९ ऑगस्ट – जन्माष्टमी
३१ ऑगस्ट – गणेश चतुर्थी
९ सप्टेंबर – गणेश विसर्जन
२ ऑक्टोबर – महात्मा गांधी जयंती
५ ऑक्टोबर – दसरा
२४ ऑक्टोबर – दिवाळी
८ नोव्हेंबर – गुरु नानक जयंती
२५ डिसेंबर – ख्रिसमस

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!