“पण कोणी गाफील राहू नये “
राज्यात १ जूननंतर पुन्हा लॉकडाऊन वाढणार, मुख्यमंत्र्यांचे संकेत
Monday To Monday NewsNetwork।
मुंबई( वृत्तसंस्था)। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग, रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. तौत्के चक्रीवादळाच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकदिवसीय पाहणी दौरा करत आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांना लॉकडाऊन बाबत प्रश्न विचारण्यात आला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर देताना म्हटले आहे. कोरोना कमी होतोय हे नक्कीच परंतु त्यासंबंधी काही बोलणार नाही. मागील लाटेवेळी आपण अनुभव घेतला आहे. आपण कोरोनावर नियंत्रण मिळवले होते परंतु थोडीशी शिथिलता आली आणि कोविड चौपटीने वाढला. सध्या कोरोनाचा विषाणू घातक आहे. अत्यंत वेगाने पसरतो आहे. सध्या गेल्या वेळच्या तुलनेत वाईट परिस्थिती आहे. हे लक्षात घेतल्यानतर पुढे आपण निर्बंध शिथील करु तेव्हा मागील अनुभवातून शहाणं व्हावं लागेल. सुरक्षेचे नियम पाळावेच लागणार आहेत. सध्याची परिस्थिती आटोक्यात असून त्यानुसार नंतर निर्णय घेऊ पण कोणी गाफील राहू नये असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भावाची दुसरी लाट हाहाकार घालत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने १ जुनपर्यंत कडक लॉकडाऊन घोषित केला आहे. कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन केले जात आहे. या लॉकडाऊनमुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा काहीसा कमी झाला असला तरी कोरोनाचे संकट टळले नाही. राज्यातील लॉकडाऊन संपण्यासाठी १० दिवसांचा कालावधी असतना पुन्हा लॉकडाऊन वाढणार असल्याचे संकेत राज्य सरकारकडून मिळत आहेत. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव हाहाकार घालतो आहे. यामध्ये आता म्युकरमायकोसिस या काळ्या बुरशीजन्य आजाराचाही प्रादुर्भाव वाढतो आहे. यामुळे दोन्ही आजारांवर उपाययोजना करण्यासाठी राज्यातील लॉकडाऊन १ जुननंतर वाढणार असल्याची शक्यात आहे.
राज्यात म्युकरमायकोसिस, कोरोनाप्रतिबंधक लसींच्या डोसची कमतरता आणि कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी तयारी सुरु आहे. याबाबत उपाययोजना करण्यात येत आहे. कोरोनाची तिसरी लाट अत्यंत भयंकर असणार असल्याचे तज्ञांनी सांगितले आहे. यामुळे राज्य सरकार १ जूननंतल लॉकडाऊन वाढविणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.राज्यात सध्या कोरोना परिस्थिती आटोक्यात आली आहे.परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही वेगाने पसरत आहेत.थोडीशी शिथिलता दिल्यास कोरोना पुन्हा हाहाकार घालायला सुरुवात करेल यामुळे लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे.
आदित्य ठाकरेंचे लॉकडाऊनवर उत्तर
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सीएनबीसीला दिलेल्या मुलाखतीत राज्यातील लॉकडाऊन वाढणार का याबाबत उत्तर दिले आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या लॉकडाऊनमुळे घटली आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येवर लॉकडाऊन अवलंबून आहे. राज्यातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी कोरोना चाचण्या वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत.कोरोना परिस्थिती आणि कोरोनाबाधितांची संख्या यावर लॉकडाऊन वाढणार का नाही हे ठरणार आहे. लॉकडाऊनच्या काळात आत्यावश्यक सेवेतील कार्यालये, निर्मिती उद्योग धंदे, आयात आणि निर्यात या सर्व सेवा सुरु आहेत. परंतु अनावश्यक कामासाठी कधी परवानगी मिळणार असे विचाराल तर यासाठी रुग्ण संख्येच्या आधारावर उत्तर असेल. राज्यातील नागरिकांचे आरोग्य आणि सुरक्षा आमची प्रथम जबाबदारी आहे. असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.