मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाबत दिशा सालियान मृत्यू प्रकरणात नारायण राणेंचा मोठा गौप्यस्फोट
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई,मंडे टू मंडे वृत्तसेवा। दिशा सालियान मृत्यू प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि पुत्र आमदार नितेश राणे यांची मालवणी पोलिसांकडून तब्बल 9 तास चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर राणे पोलीस ठाण्याच्या बाहेर आले तेव्हा त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केलाय.यावेळी त्यांनी दिशा सालियान केस प्रकरणात आता पहिल्यांदाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं थेट नाव घेतलं आहे.
नारायण राणे म्हणाले ,माझ्या स्टेटमेंटमध्ये मी सगळी माहिती सुरुवातीपासून जे घडलं ते सांगितलं. एवढंच नाही, सुशांत आणि दिशाची हत्या झाल्यानंतर मला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दोनवेळा फोन आला. सुशांत आणि दिशाच्या केसबद्दल बोलू नका. एक मंत्र्यांची गाडी होती असं बोलू नका. मी बोललो असं का बोलायचं नाही? आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. नाही, तुम्हालाही मुले आहेत. तुम्ही असं काही करु नका. पण माझं हे वाक्य माझ्या स्टेटमेंटमधून वगळलेलं आहे. मी अनेकदा हे वाक्य टाकायला सांगितलं. पण त्यांनी हे वाक्य वगळलं आहे. याचाच अर्थ आजची केस राजकीय हेतून प्रेरित होऊन मुद्दामून आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्याचा आमच्यावर काहीच परिणाम होणार नाही”, असं ही नारायण राणे म्हणाले.
पुढे त्यांनी सांगितलं की,“मला दोन दिवसापूर्वी मालवणी पोलीस ठाण्यामधून एक नोटीस आली होती. कलम 41 (अ)ची नोटीस आली होती. आपण आपलं म्हणणं सांगण्यासाठी पोलीस ठाण्याला यावं असं म्हटलं होतं. दिशा सालियनच्या आईने तक्रार केल्यामुळे तुम्हाला तुमचं म्हणणं सांगण्यासाठी बोलावलेलं आहे. दिशा सालियनबद्दल आम्ही जे काही पत्रकार परिषदेत बोललो होतो की, खरे आरोपी पकडले पाहिजे. तिची आत्महत्या नसून हत्या करण्यात आली हे आम्ही वारंवार बोलत होतो. त्यामुळे दिशाच्या आईकडे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर गेल्या. त्यांना तक्रार करण्यासाठी प्रवृत्त केलं. आमची दिशा सालियनसाठी न्याय मिळवण्याची मागणी असताना तिची आई म्हणते बदनामी होते, अशी खोटी तक्रार पोलीस ठाण्याला दिली. पोलीस ठाण्याने ती केस घेतली आणि आम्हाला बसवलं. आम्ही 9 तास पोलीस ठाण्यात होतो”, शेवटी अमित शहा याना फोन करावा लागला असं नारायण राणे यांनी सांगितलं.