ऐन दिवाळीत रेल्वेच्या १५९ गाड्या रद्द, प्रवाशांची होणार गैरसोय
मुंबई,मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। सध्या सणासुदीचे दिवस आहे. पुढील आठवड्यात दिवाळी सण आहे. या काळात देशात दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. मात्र आज रेल्वेने १५९ गाड्या रद्द केल्या आहे. ऐन सणासुदीत रेल्वेने गाड्या रद्द केल्यामुळे रेल्वे प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
यातील 18 गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले आहेत. आज 12 गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. ही यादी रेल्वेकडून सतत अपडेट केली जाते आणि अशा परिस्थितीत, रद्द, वळवलेल्या आणि वेळापत्रक बदलण्याची संख्या वाढवणे शक्य आहे. त्यामुळे या संदर्भातील अद्ययावत माहिती मिळविण्यासाठीच तुम्ही वेबसाइट बघू शकता.
रद्द केलेल्या गाड्यांमध्ये भुसावळ विभागातून धावणाऱ्या काही गाड्यांचा समावेश आहे. त्यात पुणे-हावडा दुरांतो आणि पुणे-संत्रागाची हमसफर, कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस, पुणे नागपूर गरीब रथ, पुणे जबलपूर विक्ली एक्स्प्रेसचा समावेश आहे. तसेच वांद्रे टर्मिनस-गोरखपूर हमसफर एक्सप्रेससह १७ गाड्या वळवण्यात आल्या आहेत