भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

शिवसेनेला आणखी एक धक्का,राज्याचे उच्च,तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत गुवाहटीत

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। कोकणातील शिवसेनेचे प्रमुख नेते आणि राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उदय सामंत हे गुवाहाटी चार्टड विमानाने दाखल झाले आहे.

कोकणातील शिवसेनेचे प्रमुख नेते उदय सामंत यांच्या भूमिकेबाबत राजकीय वर्तुळात कुतूहल असतानाच रविवारी (ता. २६) त्यांचा फोन नॉट रिचेबल येत होता. त्यांच्याशी अनेकदा दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही. त्यांच्या काही समर्थकांमध्ये मात्र उदय सामंत गुवाहटीला पोहोचले आहे. त्यामुळे शिवसेनेत खळबळ उडाली आहे.

राज्यात राजकीय घडामोडी सुरू असताना मंत्री उदय सामंत शिवसेनेच्या प्रत्येक बैठकीला उपस्थित राहत होते. शुक्रवारी (ता. २४) पाली येथील निवासस्थानी मंत्री उदय सामंत यांनी दिवसभर पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांशी सल्लामसलत केली. कुटुंबीयांशीही चर्चा केली. या चर्चेतील प्रतिसादाचा अंदाज घेऊन सामंत लवकरच भावी राजकीय दिशा ठरवतील, असा अंदाज मांडला जात होता.

पत्रकारांशी बोलतानाही सामंत यांनी एकनाथ शिंदे यांची बाजू समजून घेण्याची गरज असल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे उदय सामंत नक्की कुठे जाणार याबाबत तर्कवितर्क लावले जात होते. अशात शनिवारी (ता. २५) मुंबईत मातोश्रीवर झालेल्या बैठकीलाही उपस्थित राहिले होते. त्यामुळे सामंत जाणार की नाही याबाबत संभ्रम होता.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!