भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रसामाजिक

बाप्पा मोरया…आज गणेश विसर्जन, पूजा, शुभ मुहूर्त काय…

मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। आज श्री गणेश विसर्जन, गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या म्हणजेच १९ सप्टेंबर पासून सुरू झालेल्या गणेश चतुर्थी उत्सवाची आज सांगता . गणेश चतुर्थीपासून गणेशोत्सवादरम्यान गणपती बाप्पाची घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये भावपूर्वक पूजा केली जाते. श्री गणेश विसर्जन दहाव्या दिवशी केलं जातं. हिंदू कॅलेंडरनुसार, गणेश उत्सव भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीपासून सुरू होतो आणि भाद्रपद शुक्ल चतुर्दशी तिथीला संपतो. या वर्षी गणेश विसर्जन कसं करावं? पूजेचा मुहूर्त काय आहे?जाणून घेऊया

वैदिक दिनदर्शिकेनुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी बुधवार, २७ सप्टेंबर रोजी रात्री १०.१८ वाजता सुरू होत आहे आणि ही तिथी २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ०६.४९ वाजता समाप्त होईल. उदयतिथीच्या आधारे गणेश विसर्जन आज गुरुवार, २८ सप्टेंबर रोजी होणार असून आजच गणेशोत्सवाची सांगता होणार आहे. या दिवशी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..! असं म्हणत गणपती बाप्पाला निरोप दिला जातो, आणि पुढच्या वर्षी पुन्हा येण्याची प्रार्थना केली जाते. जेणेकरून जीवनातील संकटे दूर होऊन सुख-समृद्धी येवो.

यंदाचे गणेश विसर्जन – शुभ मुहूर्त
२८ सप्टेंबर रोजी सूर्योदयानंतर गणेशमूर्तींचे विसर्जन सुरू होईल. सकाळी १०.४२ ते दुपारी ०३.११ आणि नंतर दुपारी ०४.४१ ते रात्री ०९.१२ दरम्यान विसर्जनाचा चांगला मुहूर्त आहे.

या वर्षी रवि योग आणि पंचकमध्ये गणेश विसर्जन
२८ सप्टेंबर रोजी सकाळी ०६.१२ ते०१.४८ पर्यंत रवियोग आहे. विसर्जनादिवशी दिवसभर पंचक आहे. भद्रकाळही संध्याकाळी ०६.४९ पासून सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०५.०६ पर्यंत आहे.यंदाचे गणेश विसर्जन रवियोगात होणार आहे.

अनंत चतुर्दशीला भगवान विष्णूच्या अनंत रूपाची पूजा केली जाते. विष्णू भक्त अनंतची पूजा करतात आणि अनंत सूत्र म्हणजे त्यांच्या हातात अनंत धागा बांधतात. या वर्षी अनंत चतुर्दशी पूजेचा शुभ मुहूर्त या प्रमाणे-
अनंत चतुर्दशी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी ०६.१२ ते संध्याकाळी६.४९ पर्यंत आहे. त्या दिवशी तुम्हाला पूजेसाठी १२ तास ३७ मिनिटे वेळ मिळेल.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!