भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

राज्यात पुढील चार दिवस मुसळधार, अतिमूसळधार पाऊस

पुणे,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा राज्यात पुढचे चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढच्या चार दिवसांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.

आज अनंत चतुर्दशी. त्यामुळे लाखो भाविक गणपती विसर्जनासाठी घराबाहेर पडतील. पण याच वेळी पावसाची दाट शक्यता आहे. अशातच आता पुढचे आणखी काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस हजेरी लावणार आहे, पुणे हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी याबाबत माहिती दिली आहे.

हवामान विभागाकडून पुणे शहरासह जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर कोकणातील अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर आणि दक्षिण कोकणात ऑरेंज अलर्ट करण्यात आलाय. पुण्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसेच मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, आणि कोकणात मेघगर्जनासह पावसाची शक्यता आहे. विशेष म्हणजे राज्यात पुढचे आणखी काही दिवस पाऊस सक्रिय राहणार असल्याची माहिती के. एस. होसाळीकर यांनी दिलीय.

छत्तीसगडपासून दक्षिण कर्नाटकपर्यंत हवेच्या कमी दाबाची रेषा तयार झाल्याने राज्यात पुढील ३-४ दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.


भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, सप्टेंबरच्या शेवटच्या संपूर्ण आठवड्यात महाराष्ट्रात पाऊस सक्रिय असेल. बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. आज दक्षिण कोकणासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात बहुतांश ठिकाणी विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

आज पाऊस पडणार
आज अनंत चतुर्दशी. त्यामुळे गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी शेकडो भाविक घराबाहेर पडतील. पण हवामान विभागाने पावासाचा इशारा दिलाय. दुपारच्या सुमारास अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दक्षिण कोकणात पावसाचा जोर जास्त असेल. तर मध्य महाराष्ट्र, उत्तर कोकण, मराठवाडा या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे, असं के. एस. होसाळीकर यांनी सांगितलं.


नाशिक, पुणे, सातारा, सांगलीच्या घाट परिसरात ढग निर्माण झाले आहेत. कोकणातही तीच परिस्थिती आहे. मराठवाड्यात तुरळक ढग दिसत आहेत. पण हे ढगदेखील मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस देऊ शकतात,

राज्यात पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सोलापूर, पुण्यात पावसाने हजेरी लावली असून पुढील चार दिवस राज्यात मुसळधार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज आहे. राज्यात ३ ते ४ ऑक्टोबर पर्यंत पाऊस सक्रिय राहणार असल्याचा अंदाज वेधशाळेने सांगितला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!