भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

सोन्याच्या भावात मोठी उसळी, दिवाळी आधीच भाव वाढले

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। जसजशी दिवाळी जवळ येत आहे तसतशी गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात वाढ होत असतानाचे चित्र सराफ बाजारात दुसून येत आहे. गेल्या महिनाभरापासून सोने-चांदीच्या भावात चढ-उतार सुरू आहे. महिन्याभरापूर्वी सोन्याचे दर ५७ हजार रुपये प्रति तोळा सोन्याचे भाव असताना दिवाळीत बगाव वाढतील असा अंदाज होता परंतु दिवाळीला पंधरा दिवसांचा अवघी असतानाच सोन्याच्या किमतीने ६२ हजाराचा टप्पा ओलांडला .

दिवाळीच्या आधीच ६२ हजाराच्या वर सोन्याचा भ गेल्याने येन दिवाळीत सोन्याचा दर ६४ हजाराचा टप्पा गाठणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोन्याचा दर घसरून सात महिन्याच्या नीच्चांकीवर आला होता. ५७५०० रुपयावर सोन्याचा दर आल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला होता. मात्र यातच इस्त्राईल आणि हमास यांच्यात सुरु झालेल्या युद्धामुळे सोन्यासह चांदीच्या किमतीने पुन्हा मोठी उसळी घेतली. शनिवार २८ ऑक्टोबर रोजी सोन्याच्या भावात एकाच दिवसात ६०० रुपयांची वाढ होऊन ते ६२ हजार २०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले आहे. तर चांदीच्याही भावात शनिवारी ८०० रुपयांची वाढ झाली व ती ७३ हजार रुपये प्रति किलोवर पोहचली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!