भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

राष्ट्रीय

मोठी बातमी : महिलांना लोकसभा आणि विधानसभेत ३३ टक्के आरक्षण, ऐतीहासीक निर्णय

मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। रात्री उशीरा झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत महिलांना लोकसभा आणि विधानसभेत ३३ टक्के इतके आरक्षण देण्याचा देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा निर्णय घेतला आहे.

संसदेचे पाच दिवसांसाठी विशेष अधिवेशन सुरू झाले आहे. यात काही महत्वाची विधेयके मंजूर करण्यात येतील असे मानले जात होते. जुन्या संसद भवनातील हे अखेरचे अधिवेशन असून उद्यापासून नवीन सेंट्रल व्हिस्टा या इमारतीमध्ये संसद शिफ्ट होणार आहे. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय कॅबिनेटची बैठक सुरू झाली. या बैठकीत रात्री उशीरा महिलांसाठी लोकसभा व विधानसभेत ३३ टक्के आरक्षण जाहीर करण्यात आले.

गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आधी महाराष्ट्रासह अनेक राज्यांमधील महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. यानंतर आता विधानसभा आणि लोकसभेत देखील महिलांना आरक्षण मिळणार असून मोदी सरकारने घेतलेला हा एक मोठा ऐतिहासिक निर्णय मानला जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!