खाद्यतेलाच्या दरांबाबत मोठी बातमी, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। सातत्यानं वाढत्या महागाईमध्येच आता सरणाऱ्या प्रत्येक दिवशी सर्वसामान्यांना काही अंशी दिलासा मिळताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर घटल्यामुळं आणि सरकारी हस्तक्षेपामुळं आता किरकोळ बाजारातही खाद्यतेलाचे दर कमी होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
खाद्य सचिव सुधांशू पांडे यांच्या माहितीनुसार जून महिन्याच्या सुरुवातीला देशभरात शेंगदाण्याचे दर वगळता इतर खाद्यतेलांच्या किरकोळ दरात 15 ते 20 रुपयांची घट पाहण्यास मिळाली आहे. सध्या हे दर 150 ते 190 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले आहेत. यापूर्वी हेच दर 200 रुपयांच्या घरात होते.
लवकरच येणार नव्या दरांचं उत्पादन
अदानी विल्मर आणि मदर डेअरी या दोन्ही कंपन्यांकडून त्यांच्या विविध प्रकारच्या तेलांचे दर मागील आठवड्यातच कमी केले होते. यादरम्यानच नवे दर लागू असणारा मालही बाजारात आला. येत्या काळात ग्राहकांना ही उत्पादनं मिळू शकतील. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये दोन सत्रांच धाडसत्र चालवण्यात आली. याचेही तेलाच्या दरांवर परिणाम दिसून येत आहेत. तेलाचा काळाबाजार या कारवाईतून समोर आला होता.