महाराष्ट्रराजकीयराष्ट्रीय

मोठी बातमी : अपात्र आमदार सुनावणी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे महत्वाचे आदेश

मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा।सर्वोच्च न्यायालयात आज आमदार अपात्रता प्रकरणी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली सुनावणी पार पडली. विधानसभा अध्यक्षांना ३१ डिसेंबरपर्यंत आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी घ्यावी असे आदेश दिले आहेत. मे महिन्यात आम्ही निर्णय दिला होता. आता विधानसभा अध्यक्ष सुनावणी घेऊ शकत नसतील तर आम्हाला हस्तक्षेप करावा लागेल असं न्यायालयाने स्पष्ट सुनावलंय.

विधानसभा अध्यक्षांनी ३१ डिसेंबरपर्यंत सुनावणी पूर्ण करावी. त्यानंतर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात होईल असं सरन्यायाधीशांनी म्हटलं. अध्यक्ष निर्णय घेत नसल्याने सरन्यायाधीशांनी नाराजी व्यक्त केली. दिवाळी सुट्टी आणि इतर सुट्टी आहे. त्यानंतर एक महिना आहे. ३१ डिसेंबरपर्यंत आमदार अपात्रता प्रकरणी निर्णय घ्या. आम्ही विधानसभा अध्यक्षांना अनेक संधी दिल्या असल्याचं सरन्यायाधीश म्हणाले.

आमदार अपात्रता प्रकरणी याचिका दाखल करताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुनावणी पूर्ण करण्यासाठी २९ फेब्रुवारी पर्यंत वेळ मागितला होता. मात्र सर्वोच्च न्यायालायने ही याचिका फेटाळून लावत अध्यक्षांना अनेक संधी दिल्या आता डिसेंबर अखेर सुनावणी पूर्ण करा असं स्पष्ट बजावलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अतिरिक्त एक महिन्याचा कालावधी मिळणार आहे. हा कालावधी सुनावणी साठी असणार आहे. अपात्रता सुनावणीबाबत आज प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं. सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की, आमदार अपात्रता प्रकरणी सुरु असलेला हा गोंधळ आम्ही पुढच्या निवडणुका होईपर्यंत तसाच ठेवू शकत नाही. आता आम्ही वेळापत्रक ठरवलं असून ३१ डिसेंबरआधी सुनावणी पूर्ण करा असे स्पष्ट आदेश सरन्यायाधीशांनी दिले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!