भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

डॉक्टरला मारहाण ; महिला पोलीस निलंबित, जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांची कारवाई

जळगाव, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। शस्त्रक्रियेसाठी आलेल्या डाक्टर ला महिला पोलीस कर्मचाऱ्याने मारहाण केल्याने जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी तडकाफडकी निलंबित केल्याची घटना काल दि,३० आक्टोबर सोमवार रोजी घडली. जळगाव येथील सिंधी कॉलनी रस्त्यावरील पंचमुखी हनुमान मंदिर परिसरातील नीलकमल हॉस्पिटल येथे शस्त्रक्रियेसाठी आलेल्या डॉ. नीरज चौधरी यांना शहर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस शिल्पा राठोड यांनी मारहाण केली.राठोड यांची विभागीय चौकशी देखील होणार आहे.

जळगाव येथील सिंधी कॉलनी रस्त्यावरील पंचमुखी हनुमान मंदिर परिसरातील नीलकमल हॉस्पिटल येथे शस्त्रक्रियेसाठी आलेल्या डॉ. नीरज चौधरी यांना मारहाण करणाऱ्या शहर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस शिल्पा राठोड यांना पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे. तसे आदेश सोमवार, ३० ऑक्टोबर रोजी काढण्यात आले आहे. राठोड यांची विभागीय चौकशी देखील होणार आहे.

डॉ. नीरज चौधरी हे रविवार, २९ ऑक्टोबर रोजी सकाळी नीलकमल हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेसाठी त्यांचे सहकारी अजय सेनानी, मंगेश दांगोडे यांच्यासह कारने आले होते. त्या ठिकाणी कार लावण्यावरून वाद झाला आणि दोन नारळ विक्रेत्यांनी डॉक्टरची कॉलर पकडली. त्यांच्या सहकाऱ्यांवर कोयता उगारला होता. त्यानंतर त्या ठिकाणी शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचारी शिल्पा राठोड या तेथे आल्या व त्यांनी डॉ.चौधरी यांना मारहाण केली होती.


या प्रकरणी डॉ. नीरज चौधरी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हादेखील दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सोमवार, ३० ऑक्टोबर रोजी पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत विनापरवानगी कर्तव्य सोडून कर्तव्याला न शोभणारे काम केल्याने पोलीस कर्मचारी शिल्पा राठोड यांना तडकाफडकी निलंबित केले.तसे आदेश काढण्यात आले असून राठोड यांच्या विभागीय चौकशीचेही आदेश दिले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!