Corona new variant ; राज्यात पहिल्यांदाच आढळले BA व्हेरियंटचे रुग्ण; पुण्यात BA.4 चे चार, तर BA.5 चे तीन रुग्ण
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। आता पर्यंत कोरोनाचे महाराष्ट्रातील जवळपास सर्व निर्बंध हटविण्यात आले आहेत. परंतू कोरोनाच्या रुग्ण संख्येत आता वाढ होताना दिसत आहे. त्यातच राज्यात आज पहिल्यांदाच कोरोनाचे BA.4 आणि BA.5 व्हेरियंटचे रुग्ण आढळल्याची चिंताजनक माहिती समोर आल्याने राज्याचं आरोग्य विभाग सतर्क झालं आहे.
भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेने (आयसर) केलेल्या जनुकीय तपासणीत हे नवे व्हेरियंट आढळून आले आहेत.पुणे शहरातील बी.जे.वैद्यकीय महाविद्यालयाच्या समन्वयाने सुरू असलेल्या जनुकीय क्रमनिर्धारण सर्वेक्षणाच्या ताज्या अहवालानुसार पुणे शहरात BA.4 व्हेरियंटचे चार तर BA.5 व्हेरियंटचे तीन रुग्ण आढळून आले आहेत. इंडियन बायोलॉजिकल डेटा सेंटरनंही याची पुष्टी केली आहे.
आढळलेल्या रुग्णांमध्ये चार पुरूषांचा आणि तीन महिलांचा समावेश आहे.राज्यात आज आढळलेले बी ए. व्हेरियंटचे सर्व रुग्ण पुणे शहरातील आहे. सर्व रुग्णांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले असून यातील ९ वर्षाच्या लहान मुलाने लस घेतलेली नाही. सर्व रुग्णांना कोरोनाची सौम्य लक्षणे असून सर्व रुग्ण घरगुती विलिगीकरणात आहे. आज राज्यात २७७२ सक्रिय रुग्णांची नोंद सर्वाधिक रुग्ण मुंबई व पुण्या मध्ये
राज्यात सर्वाधिक म्हणजे १९२९ रुग्ण हे मुंबईमध्ये तर त्या खालोखाल पुण्यामध्ये ३१८ इतके सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात आज एकूण २७७२ इतक्या सक्रिय रुग्णांची नोंद आहे.