भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीयराष्ट्रीय

मोठी बातमी ; निवडणूक आयोगाला शरद पवार गटाकडून ‘या’ तीन नावांचा प्रस्ताव

मुंबई,मंडे टू मंडे न्युज नेटवर्क। केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह देण्याचा मोठा निर्णय घेतला. त्या मुळे निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला आज बुधवारी संध्याकाळी चार वाजे पर्यंत आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाला तीन नावांचा आणि चिन्हांचा प्रस्ताव पाठवण्याचा आदेश देण्यात आला होता. निवडणूक आयोगाच्या या आदेशानुसार शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगात तीन नावांचा प्रस्ताव पाठवण्यात आल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाला ज्या तीन नावाचा प्रस्ताव देण्यात आला आहे. यातील पहिलं नाव नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरद पवार, दुसरं नाव नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार, तिसरं नाव नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – एस असं निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून यापैकी एका नावावर शिक्कामोर्तब केलं जाण्याची शक्यता आहे. परन्तु शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाला तीन नावांचा प्रस्ताव पाठवण्यात आला असला तरी त्यांच्याकडून चिन्हांचा प्रस्ताव पाठवण्यात आलेला नाही. कारण राज्यसभेच्या निवडणुकीला चिन्हाचा वापर होत नाही. त्यामुळे शरद पवार गटाकडून राज्यसभा निवडणुकीसाठी चिन्हाचा फोटो पाठवण्यात आलेला नाही.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!