भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्रराजकीय

मोठी बातमी ; राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना धमकीचा फोन

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना धमकीचा फोन आला आहे. सकाळी कुर्डुवाडी येथे दौऱ्यासाठी येऊ नये, असा इशारा शरद पवारांना देण्यात आला . पण या फोननंतरसुद्धा शरद पवारांनी नियोजित दौरा पूर्ण केला आहे. आज सकाळी कुर्डुवाडीमध्ये दौऱ्यासाठी येऊ नये, अशी धमकी एका अज्ञात व्यक्तीकडून पवारांना देण्यात आली होती. या फोननंतरही शरद पवार डगमगले नाहीत आणि त्यांनी कुर्डुवाडीचा दौरा पूर्ण केला. फोन करणारी ही व्यक्ती कोण आहे आणि त्याने ही धमकी का दिली, याची माहिती अद्याप समोर आली नाही.

मुंबई पोलीस कंट्रोल रूमला हा फोन आला होता. पोलिसांनी या फोनची गंभीर दखल घेतली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीचा नंबर रेकॉर्डवर आला आहे. या नंबरचा शोध पोलीस घेत आहेत. धमकीचा हा फोन सोलापूरहून आल्याची माहिती आहे. या व्यक्तीचा शोध पोलीस घेत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!