मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्याचा जिल्हा दौरा
जळगाव, मंडे टू मंडे न्यूज प्रतिनिधी : राज्यात शिंदे भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे हे २० सप्टेंबर मंगळवार रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे विश्रामगृह इमारतीच्या लोकार्पण सोहळा आणि मुक्ताईनगर येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
- सावद्यात तुफान वादळासह गारांचा पाऊस,सावदा-फैजपूर रस्त्यावर झाड कोसळले
- सहा. पोलीस निरीक्षकासह पोलिस अंमलदार १० हजारांची लाच घेताना ACB च्या जाळ्यात
- ब्रेकिंग : जळगावात ‘एम.डी.’ या घातक ड्रग्ज तस्करांचा पर्दाफाश, साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांना अटक
दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे–
मंगळवार 20 सप्टेंबर रोजी दुपारी 3.00 वा. जळगाव विमानतळ येथे आगमन व मोटारीने पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण. दुपारी 3.45 वा. पाळधी येथे आगमन. दुपारी 4.00 वा. पाळधी येथील शासकीय विश्रामगृह नविन इमारतीचा लोकार्पण सोहळा. सायं. 4.30 वा.पाळधी येथून मोटारीने मुक्ताईनगरकडे प्रयाण. सायं. 5.30 वा. मुक्ताईनगर येथे आगमन व जाहिर सभेस उपस्थिती. रात्री सोईनुसार मुक्ताईनगर येथून मोटारीने जळगाव विमानतळाकडे प्रयाण. रात्री सोईनुसार जळगाव विमानतळ येथे आगमन व तेथुन शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण.




