भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

मोठी बातमी! ठाकरे गटाला पुन्हा खिंडार पडणार? १२ आमदार आमच्या संपर्कात! शिंदे गटाचा दावा

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा।ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी शिंदे गटाचे खासदार आणि आमदारा आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. विनायक राऊत यांचा हा दावा शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी खोडून काढला आहे. उलट ठाकरे गटाचे १२ आमदार आणि काही खासदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा गजानन कीर्तिकर यांनी केला आहे. कीर्तिकर यांच्या या दाव्याने खळबळ उडाली आहे. कीर्तिकर यांच्या या दाव्यामुळे ऐन लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठं खिंडार पडणार असल्याचं सांगितलं जात आहे.

गजानन कीर्तिकर हे मीडियाशी संवाद साधत होते. उलट त्यांच्याकडे जे १५ आमदार आहेत, ५ खासदार आहेत त्यातील पाच पैकी तीन ते चार लोक तर नाहीच.. त्यातील दोन ते तीन लोक आहेत, त्यांची नाव घेणार नाही, पण ते अजिबात येणार नाहीत, ते मोठे लाभार्थी आहेत. १५ पैकी दोन ते तीन लाभार्थी आहेत ते आमच्या सोबत येणार नाहीत. मात्र १२ आमदार आमच्या संपर्कात आहेत, असं गजानन कीर्तिकर म्हणाले.


गजानन कीर्तिकर यांच्या विरोधात त्यांचा मुलगा अमोल कीर्तिकर यांनी ठाकरे गटाकडून तिकीट दिले जाणार आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. लोकसभा निवडणूक मी लढवेल की नाही मला माहीत नाही. लोकसभेचा उमेदवार म्हणून महाविकास आघाडीने अमोलला उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. पण लोकसभा निवडणुकीपर्यंत महाविकास आघाडी टीकेल की नाही हे सांगता येत नाही, असं कीर्तिकर यांनी सांगितलं. काही महिन्यांनी आघाडीच संपुष्टात येईल, असा दावाही त्यांनी केला आहे.

कीर्तिकर यांचा यू टर्न
भाजपकडून सापत्न वागणूक मिळत असल्याच्या विधानावरून कीर्तिकर यांनी यू टर्न घेतला. भाजपकडून सापत्न वागणूक मिळतेय असं मी बोलोच नाही, माझ्या तोंडात ते टाकलं गेलं. मी खासदार होतो त्या अडीच वर्षात बीजेपी-शिवसेना युती नव्हती महाविकास आघाडी होती. शिंदे साहेबांनी उठाव करून ती युती प्रस्तावित केली.

पुन्हा शिवसेना-बीजेपीच सरकार आलं. मुख्यमंत्री शिंदे झाले. आम्ही एनडीए चे घटकपक्ष म्हणून खासदार वावरत होतो. आम्हला एनडीए घटक पक्षाचा दर्जा नव्हता. आता आम्ही एनडीएचे घटक पक्ष आहोत. तो जो फरक आहे. त्याठिकणच्या केंद्रीय मंत्र्यांना कळला की नाही? की आम्ही आहे तिथेच समजतात की काय? हा त्यामागचा बोलण्याचा हेतू होता, असं त्यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!