भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीयमहाराष्ट्ररावेर

देशभरातील पोटनिवडणुकांमध्ये भाजपची पीछेहाट

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। देशात चार विधानसभा आणि लोकसभेच्या एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला धक्का बसला आहे. भाजपला सर्व पाचही जागांवर पराभवाचा धक्का बसला आहे. यात तृणमूल काँग्रेसने (TMC) एक लोकसभा आणि एक विधानसभेची जागा मिळवली आहे. काँग्रेसने (Congress) दोन विधानसभेच्या जागा मिळवल्या असून, राष्ट्रीय जनता दलाने (RJD) विधानसभेची एक जागा मिळवली आहे.

महाराष्ट्रासह 4 राज्यांतील लोकसभेच्या 1 व विधानसभेच्या 4 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचा धुव्वा उडाला आहे. पश्चिम बंगालच्या आसनसोल लोकसभा व बीलागंज विधानसभा मतदार संघात सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचा विजय झाला आहे. याठिकाणी तृणमूलचे शत्रुघ्न सिन्हा व बाबुल सुप्रियो विजयी झालेत. तर महाराष्ट्रातील कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघात काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांनी आपले प्रतिस्पर्धी भाजप उमेदवार सत्यजित कदम यांचा तब्बल 19 हजार मतांनी दारुण पराभव केला आहे. बिहारच्या बोचहा मतदार संघात राजदने भाजपला पिछाडीवर टाकले आहे. दहाव्या फेरीनंतर राजदचे अमर पासवान यांच्याकडे तब्बल 13 हजार मतांची आघाडी होती. छत्तीसगडच्या खैरागढ विधानसभा मतदार संघातही काँग्रेसच्या उमेदवाराने विजयी आघाडी घेतली आहे.

कोल्हापूर उत्तरमध्ये पुन्हा काँग्रेस
कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी तब्बल १८ हजार ९०१ मतांच्या मताधिक्याने दणदणीत विजय मिळविला आहे. या पोटनिवडणुकीत जयश्री जाधव यांना एकूण ९६ हजार २२६ मत मिळाली तर भाजपचे पराभूत उमेदवार सत्यजित कदम यांना ७७ हजार ४२६ मत मिळाली. त्यामुळे कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीला भाजपचा करेक्ट कार्यक्रम करण्यात यश आले आहे.

बंगालमध्ये शत्रुघ्न सिन्हा अन् बाबुल सुप्रियोंची बाजी
असनसोल लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेसचे उमेदवार अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी विजयाकडे वाटचाल केली आहे. त्यांनी भाजपच्या उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्यावर तब्बल दोन लाखांनी आघाडी घेतली आहे. तृणमूलचे उमेदवार माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी बालीगंज विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. सुप्रियो यांना 20 हजार 228 मतांनी विजय मिळवला आहे. दुसऱ्या क्रमांकावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा उमेदवार आहे. भाजप तिसऱ्या स्थानी तर काँग्रेसच्या चौथ्या स्थानी आहे.

बालीगंज विधानसभा
दुसरीकडे, बंगालच्या बालीगंज विधानसभा मतदार संघात बाबुल सुप्रियो यांनी भाजप उमेदवार केया घोष व मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या (CPI-M)सायरा शाह यांचा पराभव केला आहे. माजी आमदार तथा राज्याचे मंत्री सुब्रत मुखर्जी यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती.

बिहारमध्ये तेजस्वी यादवांचा धक्का
बिहारमध्ये भाजप सत्तेत असून, विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाने बोचहां मतदारसंघात विजय खेचून आणला आहे. आरजेडीचे अमरकुमार पासवान हे विजय झाले असून, त्यांनी भाजपच्या उमेदवाराचा तब्बल 36 हजार मतांनी विजय मिळवला आहे. दिवंगत आमदार मुसाफिर पासवान यांचे पुत्र अमरकुमार यांना तिकीट देण्याची खेळी आरजेडीने खेळली होती. त्यांना 82 हजार 562 मते मिळाली. याचवेळी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने माजी मंत्री रमाई राम यांच्या कन्या गीता कुमारी यांना तिकीट दिले होते. त्यांना 45 हजार 909 मते मिळाली. पासवान यांनी कुमार यांचा तब्बल 36 हजार मतांनी पराभव केला आहे. सत्ताधारी भाजप आणि संयुक्त जनला दलाला आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांनी हा मोठा धक्का दिल्याचे मानले जात आहे.

छत्तीसगडमध्ये काँग्रेसचा विजय
छत्तीसगडमध्ये पोटनिवडणुकीत काँग्रेसनं विजयाकडे वाटचाल केली आहे. खैरागड मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार यशोदा वर्मा यांनी भाजपच्या कोमल जांघेल यांच्यावर 15 हजार 633 मतांची आघाडी घेतली आहे. मतमोजणीच्या अजून तीन फेऱ्या बाकी असून, वर्मा यांच्या विजय निश्चित मानला जात आहे. जनता काँग्रेसचे छत्तीसगड (जोगी) पक्षाचे आमदार देवव्रतसिंह यांच्या मृत्यूमुळे खैरागड मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. विशेष म्हणजे मागील निवडणुकीत भाजपच्या जांघेल या केवळ 870 मतांनी हरल्या होत्या.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!