शरद पवारांबाबत वादग्रस्त फेसबुक पोस्ट ; केतकी चितळेला 18 मे पर्यंत पोलीस कस्टडी
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांबाबत आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेला 18 मे पर्यंत पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे. कोर्टात केतकीने वकील न घेता तिनं स्वतः कोर्टात युक्तिवाद केला. सकाळी केतकी हिला सुट्टीच्या न्यायालयात हजर करण्यात आले. या पोस्टबाबत अधिक तपास करण्यासाठी कस्टडीची आवश्यकता असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली.
ठाणे गुन्हे शाखेने 5 दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाकडे मागितली. केतकीने कोर्टात सांगितलं की, ती पोस्ट माझी नाही. ती मी सोशल मीडियातून कॉपी करुन पोस्ट केली होती. सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करणं गुन्हा आहे का? असा सवाल देखील तिनं केला. केतकीने सुनावणीदरम्यान वकील घेतला नाही, ती स्वतः कोर्टात युक्तिवाद केला. केतकीनं सांगितलं की मी या पोस्ट मी डिलीट करणार नाही. माझा तो अधिकार आहे, असंही तिनं कोर्टासमोर म्हटलं.
केतकीवर आतापर्यंत राज्यभरातील अनेक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आज मुंबईतील पवई पोलीस ठाण्यात आणि अमरावतीतल्या गाडगे नगर पोलीस ठाण्यात आणि नाशिक सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. याआधी कळवा, पुणे, पिंपरी-चिंचवड, धुळे, सिंधुदुर्ग, अकोला, मुंबईतील गोरेगाव इथं केतकीविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान केतकी चितळेला आज कोर्टात हजर करण्यात आलं.