भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

राज्यात पुन्हा भूकंम्प : आणखी एका मोठ्या दाव्याने खळबळ

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। अध्यक्ष पदाचा दिलेला राजीनामा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मागे घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतील संभाव्य भूकंप टाळला गेला आहे. शरद पवार यांच्या या भूमिकेमुळे अजित पवार यांनाही चेकमेट बसला असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना अजित पवार यांचं बंड अजूनही थांबलेलं आहे असं वाटत नाही. या संदर्भात अंजली दमानिया यांनी मोठं विधान केलं आहे. अजित पवार भरपूर काम करतात. भ्रष्टाचारही करतात. त्याविरोधात मी लढलेही आहे. अजित पवार यांची आता ना घर का ना घाटका अशी परिस्थिती झाली आहे. ते शांत बसतील असं मला वाटत नाही. येत्या काही दिवसात, महिन्यात म्हणजे दिवाळीपर्यंत ते पुन्हा दगाफटका करतील यात शंका नाही, असा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे. दमानिया यांच्या या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे.

शरद पवार यांच्या राजीनाम्यावरही अंजली दमानिया यांनी भाष्य केलं आहे. शरद पवार हे त्यांच्या बोलण्यावर ठाम राहिले असते तर सगळ्यांना आनंद झाला असता. त्यांनी राजीनामा दिला होता. त्यावर ठाम राहायला हवं होतं. नव्या नेतृत्वाला संधी द्यायला हवी होती. पण ते शरद पवार आहेत. ते शेवटपर्यंत सत्ता सोडणार नाहीत. शेवटपर्यंत पद सोडणार नाहीत, असा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे.

शरद पवार यांनी खेळी करून बॅटही माझी आणि चेंडूही माझा हे दाखवून दिलं आहे. पण ही स्टोरी बोगस स्टोरी आहे. येत्या काही दिवसात ते दिसून येईल. अजित पवार यांची खेळी अजून संपलेली नाही. येत्या काही दिवसात ते आपल्या आमदारांना गोळा करून मोठा दगाफटका करतील, असा दावा दमानिया यांनी केला आहे. सुप्रिया सुळे या राष्ट्रीय लेव्हलला बघतील आणि अजित पवार राज्य सांभाळतील असं या दोघांना समजावण्यात आलं. पण २ मे रोजी शरद पवार यांनी भलताच निर्णय घेतला. त्यामुळे अजित पवार अस्वस्थ आहेत. कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जाण्याचा प्लॅन त्यांनी रचला होता. पण ते तोंडघशी पसरल्यासारखे झाले आहेत. परंतु आता राजकारणाचा उकीरडा झाला आहे, असं मला वाटतंय, असंही त्या म्हणाल्या.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!