भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

विधानसभा विरोधी पक्ष नेतेपदी काँग्रचे विजय वडेट्टीवार यांची निवड

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची निवड विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून करण्यात आली आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड करुन सत्तेत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर विरोधी पक्षनेतेपद रिक्त झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांची निवड केली होती. मात्र, आमदारांच्या संख्याबळाची संख्या पाहता हे पद काँग्रेसकडे गेले. काँग्रेसने प्रदीर्घ खल केल्यानंतर वडेट्टीवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. वडेट्टीवार यांच्या रुपात राज्याला विधानसभेत विरोधी पक्षनेता मिळाला आहे.

मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका गटाने तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली शिंदे सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर आता विरोधी पक्षनेतेपदी कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात होता.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील मोठा गट सरकारमध्ये सहभागी झाल्याने आमदार संख्येचे आधारे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे देण्याचा निर्णय महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी घेतला. मात्र पावसाळी अधिवेशन सुरु होऊन एक आठवडा उलटला तरी विरोधी पक्ष नेता कोण याचं उत्तर मिळालेलं नव्हतं. अखेर महाराष्ट्राला विरोधी पक्षनेता मिळाला आहे.

काँग्रेसने विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेता पदी नियुक्ती केली आहे. तर विधिमंडळ पक्षनेतेपदी बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली आहे. मागील 2 आठवड्यांपासून विरोधी पक्षनेते पदाचा उमेदवार कोण हे ठरत नव्हतं. मात्र 2 आठवड्यांनंतर अखेर विरोधी पक्षनेते पदाच्या नावावरील पडदा उठला आहे. दिल्लीमधून हा निर्णय घेण्यात आलंचं सांगितलं जात आहे.

आज हायकमांडने महाराष्ट्राच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेता म्हणून विजय वडेट्टीवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. यासंदर्भात आता काँग्रेस पक्षाकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे पक्षाच्यावतीने पत्र पाठवून या नियुक्तीबद्दल कळवलं जाईल. यानंतर नियुक्तीबाबतच्या पुढील प्रक्रिया सुरु होतील असं सांगण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!