ब्रेकिंग ; मोदी सरकारचा मोठा निर्णय! पेट्रोल – डिझल झाले स्वस्त, किमती इतक्या रुपयांनी झाल्या कमी
मुंबई,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l देशात लोकसभा निवडणुक जाहीर होण्यापूर्वी केंद्राने गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांची कपात केली. १५ मार्च रोजी सकाळी ६ वाजल्यापासून नवीन दर लागू होतील, असे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने सांगितले.
लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस (एलपीजी) आणि कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) च्या किमतींमध्ये नुकत्याच झालेल्या कपातीमुळे, आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता वर्तवली जात होती.
X वरील एका पोस्टमध्ये पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणाले की, “पेट्रोल आणि डिझेलच्या किमती २ रुपयांनी कमी करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की कोट्यवधी भारतीयांच्या कुटुंबाचे कल्याण आणि सुविधा हे त्यांचे नेहमीच ध्येय आहे.
कोणत्या शहरात कसे असतील दर –
दिल्लीत पेट्रोलचे दर ९६.७२ रुपयांवरून ९४.७२ रुपयांवर आले आहेत तर मुंबईत पेट्रोलचे दर १०६.३१ रुपयांवरून १०४.२१ रुपयांवर आले आहेत. कोलकातामध्ये पेट्रोलचे दर १०६.३ रुपयांवरून १०३.९४ रुपयांपर्यंत कमी होणार आहेत.