भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीयआरोग्य

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना भरपाई द्या,सुप्रिम कोर्टाचा आदेश

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। देशामध्ये साधारण दीड ते दोन वर्षांपूर्वी कोरोनाने हाहा:कार माजवला होता. अनेकांना कोरोनाची लागण झाली तर कोरोनाने अनेकांचा बळी देखील घेतला. आता सध्या देशात कोरोना रूग्णांची संख्या कमी आहे. मात्र, कोरोनामुळे होणारे मृत्यू सुरूच असल्याचे आकडेवारीवरून पुढे येते. कोरोनाच्या काळात आर्थिक स्थिती खराब झाली. कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतू अध्यापही मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना कोणतीही आर्थिक मदत पोहचली नसल्याचे समोर आले. आता सर्वोच्च न्यायालयानेच राज्य सरकारला या कुटुंबियांना लगेचच मदत करण्याचे आदेश दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी राज्य सरकारला दिले आदेश
सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी राज्य सरकारला आदेश देत म्हटले आहे की, आता अजिबात वेळ न घालता लगेचच कारवाई करून संबंधितांना भरपाई द्यावी. इतकेच नाही तर ज्यांनी तक्रारी केल्या आहेत, त्यावर चार आठवड्यामध्ये निर्णय द्यावा. आंध्र प्रदेशमधील एका याचिकेवर सोमवारी ही सुनावणी न्यायमूर्ती एम. आर. शाह आणि न्यायमूर्ती बी. व्ही. नागरला यांनी केली. सर्व यंत्रणांनी कामाला लागून आदेशाचे पालन करावे आणि पात्र कुटुंबियांना भरपाई द्यावी, असे आदेश खंडपीठाने राज्यांना दिले आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!