महाराष्ट्रराष्ट्रीयसामाजिक

मोठा दिलासा ! एलपीजी गॅस सिलिंडर झाला स्वस्त

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l २०२४ या नवीन आर्थिक वर्षात मोठा दिलासा मिळाला आहे. आज एलपीजी गॅस सिलिंडर स्वस्त झाला आहे. एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. आज गॅस सिलिंडरच्या दरात ३० रुपयांहून अधिक कपात करण्यात आली आहे. १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. घरगुती नव्हे,घरगुती गॅस सिलेंडर च्या किमतीत कुठलाही बदल करण्यात आलेला नाही, घरगुतीच्या किमती जैसे थे आहेत.फक्त
व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडर स्वस्त झाला आहे. १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडर आता ३०.५० रुपयांनी स्वस्त झाला आहे.

IOC नुसार, मुंबईत ३१.५९ रुपयांनी आणि दिल्लीत आजपासून १९ किलोचा एलपीजी सिलिंडर १७६४.५० रुपयांना मिलणार आहे. पूर्वी तो १७९५ रुपयांना मिळत होता. कोलकाता येथे हा सिलिंडर आता १९११ रुपयांऐवजी १८७९ रुपयांना मिळणार आहे. पूर्वी तो १८४९ रुपयांना मिळत होता. चेन्नईमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडर आता १९३० रुपयांना मिळणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!