राशिभविष्य ; आज अमावस्या, बुधवार १६ ऑगस्ट २०२३, अधिक मास समाप्तीचा दिवस, कसा असेल आपला आजचा दिवस
मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। आज अमावस्या, रोज बुधवार १६ ऑगस्ट २०२३, अधिक मास समाप्तीचा दिवस, ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंबआणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
आज अमावस्या, अधिक मास समाप्तीचा दिवस ; आज अधिक श्रावण अमावस्या दुपारी ०३.०७ पर्यंत. अधिक मास समाप्ती. चंद्र आज कर्क राशीत दुपारी ०४.५६ पर्यंत राहील.
मेष – आज चतुर्थ स्थानात चंद्र शुक्र उत्तम फळ देईल. कुटुंब आनंदी राहील. सार्वजनिक कार्यात भाग घ्याल. तसेच राशी स्थानातील गुरू नाव लौकिक वाढवेल. जीवनात रस निर्माण करेल. दिवस शुभ.
वृषभ – घरात महत्त्वाचे निर्णय घ्याल. तृतीय स्थानातील चंद्र भावंड भेट घडवेल. व्यय राहू गुरू कायद्याचे बंधन पाळा, असे सांगत आहे. घरामध्ये जबाबदारी येईल. प्रकृतीची काळजी घ्या. आर्थिकदृष्ट्या दिवस बरा.
मिथुन – आज चंद्र आर्थिक आणि व्यवसायासंबंधी क्षेत्रात यश देईल. सामाजिकदृष्ट्या चांगला दिवस आहे. लाभ स्थानात गुरू आहे. कार्याला शुभ संकेत देत आहे. वैवाहिक जीवन आनंदात जाईल. प्रवास योग येईल, दिवस उत्तम.
कर्क – चंद्र भ्रमण राशीस्थानातून होत आहे. चंद्र शनि प्रतियोग नैराश्य वाढवेल. घरामध्ये पाहुणे येतील. आर्थिकदृष्टया बरा दिवस. जास्त काळ कार्यात घालवाल. प्रकृतीला जपा. रवि गुरू सामाजिक लाभ देईल. दिवस उत्तम.
सिंह – आज राशी स्वामी रवि व्यय स्थानात आहे. अधिकारी व्यक्तींशी संबंध येईल. व्यय चंद्र सामाजिक क्षेत्रात आणि जीवनात विशेष घटना घडवेल. आर्थिक लाभ होतील. धार्मिक स्थळांना भेट असा योग आणेल. दिवस उत्तम.
कन्या – व्यय स्थानातील मंगळ व्यावसायिक आणि आर्थिकदृष्ट्या अचानक फळ देईल. खर्चात वाढ करेल. वैवाहिक जीवन बरे राहील. जोडीने घरासाठी खरेदी कराल. अष्टमातील ग्रह प्रकृती जपा असे सांगत आहे. दिवस बरा.
तूळ – लाभस्थानात मंगळ आर्थिक, नोकरीसंबंधी लाभ घडवेल. कुटुंबाचे सुख मिळेल. सामाजिक घटना घडतील. सप्तम चंद्र, राशीतील केतू थोडा मानसिक ताण निर्माण करेल. शनी संततीकडे लक्ष द्या, असे सांगत आहे. दिवस उत्तम.
वृश्चिक – चंद्र व्यावसायिक, मानसिक, आर्थिक स्वास्थ्य निर्माण करील. रवि संतती आणि शिक्षण यासाठी उत्तम आहे. प्रवास जपून करा. भोवताल परिस्थितीचे भान ठेवा. घरामध्ये जास्तीचे काम पडेल. नोकरीमध्ये संधी, वैवाहिकदृष्ट्या दिवस मध्यम.
धनू – आर्थिक बाजू समाधानी असेल तर मन आनंदी राहील. शुक्र-मंगळ भ्रमण खर्चिक अनुभव देईल. जोडीदार आणि मित्रमंडळींसोबत मजेत दिवस जाईल. संततीची काळजी घ्या. दिवस शुभ.
मकर – रवि धर्म आणि संस्कृतीबद्दल आस्था देईल. जोडीदाराला यश देईल. पोटाची काळजी घ्या. मातृ-पितृ चिंता निर्माण होईल. तसेच वरिष्ठांशी मतभेद संभवतात. शुक्र-चंद्र वैवाहिक जीवनाची दिशा निश्चित करेल, प्रवास संभवतात. दिवस कामकाज करण्यात घालवाल.
कुंभ – षष्ठस्थानातील चंद्र परदेशविषयी शुभ समाचार देईल. सरकार दरबारी असलेली कामे होतील. राशी स्थानातील शनी मानसिक विरक्त वृत्तीचा अनुभव देईल. ईश कृपेने दिवस चांगला जाईल.
मीन – मंगळ प्रकृतीची काळजी घ्या, असे सांगत आहे. सरकारी कामे, वरिष्ठ भेट होईल. अष्टम केतू कमरेचे त्रास निर्माण करील. चंद्र सामाजिक जीवनात लाभ देईल. संतती, गृहसौख्य मिळेल. आर्थिकदृष्ट्या दिवस शुभ.शुभम भवतू !!
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा