राशिभविष्य ; आज सोमवार १० जुलै २०२३, आज आषाढ कृष्ण अष्टमी. चंद्र आज मीन राशीतून भ्रमण करेल.
मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। आज सोमवार १० जुलै २०२३, ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंबआणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
मेष
आज राशीतील राहू गुरू योग अनेक घडामोडी घडवेल. घरात सुखद वातावरण राहील. व्यय चंद्र आहे ,नकारात्मक विचारांना दूर ठेवा. जास्तीचे काम काढून घराची सजावट करण्याकडे कल राहील. पूजा, धार्मिक कार्य घडेल. वास्तूमध्ये आनंदी स्पंदने राहतील. दिवस शुभ.
वृषभ
आज गुरू राहू व्यय स्थानातून भ्रमण करीत आहे. धार्मिक बाबीमध्ये, घरात सुखद अनुभव येतील. शनि नोकरीत काळजी घेण्याचे संकेत देत आहे. प्रवास योग येतील. उत्तम फळ देणारा असा हा दिवस आहे.
मिथुन
आज राहू गुरू लाभस्थानातून भ्रमण करीत आहे. आर्थिक आणि कौटुंबिक, जबाबदाऱ्या पूर्ण कराल. रवि बुध नियम न मोडण्याचे संकेत देत आहेत. जोडीदाराला काही त्रास होऊ शकतो. काळजी घ्या. दिवस शुभ.
कर्क
आज राहू गुरू दशम स्थानात असून सकारात्मक विचार देईल . कामात पारदर्शकता येईल. सांसारिक जीवनात ताण राहील . प्रकृती जरा शिथिल राहील. नवीन व्यक्तींशी संपर्क होईल. गृहसौख्य मिळेल. दिवस उत्तम.
सिंह
आज शुक्र मंगळ राशी स्थानात असेल. अचानक प्रवास योग. भावंड भेट होईल .स्वतः मध्ये सुधारणा करा. अष्टम चंद्र आहे, आरोग्य जपा. नुकसान टाळायचा प्रयत्न करा. घरामध्ये वेळ द्या .दिवस मध्यम जाईल.
कन्या
अष्टम स्थानातून गुरूराहू भ्रमण कष्ट देणारे असून , घरामध्ये घडामोडी दर्शवित आहे. मित्र मैत्रिणीसोबत दिवस व्यतीत करा. नकोसे विचार टाळा. घरात जास्तीचे खर्च होतील. मात्र लाभ देखील होतील. दिवस मध्यम .
तुला
आज दिवस पाहुणे मंडळींची भेट, समारंभ , आर्थिक लाभ ,प्रवास अश्या बाबी मध्ये यश देईल.नवीन व्यक्तीची ओळख होईल. प्रवास योग येतील. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. कार्यालयात जास्तीचे काम पडेल. जोडीदाराची काळजी घ्या. दिवस उत्तम.
वृश्चिकī
षष्ठस्थानातील ग्रह वडीलधाऱ्या व्यक्तींचे आशीर्वाद घेण्यास आणि घरासंबंधी काही निर्णय घेण्यास योग्य आहे. पंचम चंद्र संतती, आर्थिक लाभ मोठ्या व्यक्तींचा सहवास देईल.. दिवस मध्यम.
धनु
आज दिवस घरगुती कामात जाईल. मन रमेल. संततीचे आरोग्य सांभाळा. नकारात्मक व्यक्ती आणि विचार दूर ठेवा. कार्य करण्यासाठी प्रवृत्त व्हाल. जोडीदाराची चिंता वाटेल. आर्थिक दृष्ट्या दिवस बरा आहे.
मकर
कौटुंबिक जीवन आणि भावंड यांची काळजी घेण्याचा आज दिवस आहे. नोकरी साठी प्रवास करताना जपून राहा. आरोग्य चिंता वाटेल. आर्थिक दृष्ट्या एकूण दिवस बरा आहे.
कुंभ
राशी स्थानातील शनी भ्रमण हे नकारात्मक विचारा पासून सावध रहा असे आवाहन करीत आहे. प्रकृती उत्तम राहील. संततिशी कलह टाळा. वैवाहिक जीवनात कुरबुरी होतील. प्रवास योग येतील. गुरू साथ देईल. दिवस बरा.
मीन
आज राशीतील चंद्र संततीला लाभ ,त्यांच्या आनंदात सहभागी व्हा असे संकेत देत आहे. सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या उत्तम दिवस.शैक्षणिक लाभ होतील. दिवस उत्तम.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा