राशीभविष्य : आज सोमवार १८ डिसेंबर २०२३, कसा असेल आपला आजचा दिवस
मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। आज सोमवार १८ डिसेंबर २०२३, ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंबआणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
मेष ः-
राजकीय-सामाजिक कार्यात प्रभाव वाढेल. जवळचे लोक मनातून संभ्रमात पडतील. धंदा वाढेल.
वृषभ ः-
अभिमान न बाळगता काम करा. यश मिळेल. कोर्टाच्या कामात जिद्दीने यश मिळवता येईल.
मिथुन ः-
नोकरीत वरिष्ठ खूश होतील. अधिकार मिळेल. प्रेमाला चालना मिळेल. कला क्षेत्रात चमकाल.
कर्क ः-
गुप्त कारवायांचा त्रास होईल. कामाचा व्याप वाढेल. कायदा मोडू नका. मदत करणारी व्यक्ती ओळखून ठेवा.
सिंह ः-
प्रकृतीत सुधारणा होईल. मान-प्रतिष्ठा मिळेल. घरातील माणसांना प्रेमाने वागवा. गैरसमज दूर होईल.
कन्या ः-
वरिष्ठ तुमच्या विरोधात बोलण्याची शक्यता आहे. प्रेमाची माणसे तुमची काळजी घेतील. दादागिरी करू नका.
तूळ ः-
आवडत्या विषयात मन रमेल. चमचमीत पदार्थ खाण्यास मिळतील. प्रसिद्धी मिळेल. नवी ओळख होईल.
वृश्चिक ः-
बोलताना, थट्टा मस्करी करताना अतिरेक करू नका. प्रवासात क्षुल्लक अडथळे येतील. चीडचीड करू नका.
धनु ः-
तुम्ही ठरविलेले काम करू शकाल. साहित्याला नवा विषय मिळेल. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील.
मकर ः-
मान-प्रतिष्ठा मिळेल. नवीन ओळखीचा उपयोग करून घेता येईल. धंद्यात नवे काम मिळेल.
कुंभ ः-
कला क्षेत्रात मन रमेल. विचारांना चालना मिळेल. मान-सन्मानाचा योग येईल. प्रेम मिळेल.
मीन ः-
संयम ठेवा. रागावर ताबा ठेवा. कामात लक्ष द्या. मनाची चंचलता होईल. मोठे आश्वासन मिळेल