राशीभविष्य : आज सोमवार ३० आक्टोबर २०२३. महत्त्वाचे निर्णय होतील,नवीन संधी मिळतील, वैवाहिक जीवनात वादळ येऊ शकते
मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। आज सोमवार ३० आक्टोबर २०२३, ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंबआणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
मेष –
अचानक दिनक्रमात आनंदी अनुभव येतील. जास्त काम पडले तरी उत्साह राहील. मानसिक द्वंद्व कमी होईल. घराची जबाबदारी, वैवाहिक जीवनात कुटंब आणि आर्थिकदृष्ट्या शुभ दिवस.
वृषभ –
आज दिवस शांततेने व्यतीत करण्याचा आहे. दशमात शनि वक्री, व्यय स्थानात ग्रह आर्थिक नुकसानीचे योग आणतील. प्रकृती जपा. व्यय स्थानातील चंद्रराहू आरोग्य, ऊर्जा आणि मनशांती कमी करेल. दिवस मध्यम.
मिथुन –
काहीसा सामाजिक ताण उद्भवणार असून ईश्वरी पाठबळ राहील. खर्च खूप होईल. लाभ स्थानातील चंद्र राहू अचानक मित्र भेट घडवतील. प्रवास टाळा. धार्मिक आणि आर्थिकदृष्ट्या बरा दिवस.
कर्क –
कर्म स्थानात गुरू-राहू चंद्र योग आहे. राशी स्वामी चंद्र आर्थिक जीवनात यश आणेल. संततिविषयी चिंता वाटेल. गुरूचे पाठबळ व शुक्र नोकरीत चांगले फळ देईल. प्रकृती जपून काम करा. दिवस चांगला.
सिंह –
तृतीय स्थानात बुध बुद्धीदायक असून अनेक लाभ देईल. प्रकृतीची काळजी घ्या. भाग्य चंद्र आहे. महत्त्वाचे निर्णय होतील. गुरू भाग्यात उत्तम साथ देईल. दिवस ईश पूजनात घालवा.
कन्या –
सामाजिक आणि गृह क्षेत्रात काही घडामोडी होतील. प्रकृती उत्तम राहील. चंद्र आर्थिक व्यय देणार असून कुटुंबीयांचे आरोग्याचे प्रश्न कमी होतील. संतती आनंदात राहील. दिवस उत्तम. गणरायाचे नामस्मरण करावे.
तूळ –
शुक्र लाभ स्थानात नोकरीमध्ये संधी देईल. अध्यात्मिक बाबीत खर्च भरपूर होईल. घरात सुखसोयीमध्ये वाढ होईल. सामाजिक क्षेत्रात नवीन संधी मिळतील. जबाबदारी येईल. संततीकडे लक्ष द्या. प्रवासात जपून रहा. दिवस मध्यम.
वृश्चिक –
मंगळ वृश्चिक व्यक्तींना नोकरीनिमित्त प्रवास, बढती देईल. वडिलांची प्रकृती जपण्याचे संकेत देत आहे. प्रयत्न पूर्वक जागरूक रहा. वैवाहिक जीवनात वादळ येऊ शकते. विवाहसौख्य, आर्थिक, धर्मकारण यासाठी उत्तम फळ देईल. ईश स्मरण करावे.
धनू –
गुरुकृपा आणि रवि बळ नोकरी आणि व्यवसायात अडचणीतून मार्ग काढेल. पंचम गुरू व पंचमस्थानात चंद्र सामाजिकदृष्टया ठीक राहील. संततीला जपा. प्रकृती जपा. दिवस चांगला.
मकर –
चंद्र आणि शुक्र यांचा प्रभाव आहे, त्यामुळे कौटुंबिक जबाबदारी, आर्थिक व्ययाचे योग बनत आहे. वैवाहिक जीवन मध्यम राहील. प्रवास योग येतील. जोडीदारासोबत वेळ घालवाल. दिवस ठीक.
कुंभ –
शनी राशीमध्ये वक्री भ्रमण करीत आहे. कुंभ व्यक्ती आज ताण अनुभव करतील. तृतीय चंद्र घरात जास्त जबाबदारी निर्माण करेल. प्रकृती जपा. नातेवाईक भेट होईल. मुलांचे प्रश्न सुटतील. संतती, व्यवसाय नोकरीसाठी शुभ दिवस.
मीन –
राशी स्वामी गुरु राहूसोबत असून परदेशगमन होईल. चंद्राच्या धनस्थानातील उपस्थितीमुळे आर्थिक आणि कौटुंबिक जीवनात अनेक गोष्टींमुळे कष्ट असा हा काळ आहे. प्रवास होतील. कार्यालयीन जीवनात सुधारणा होईल. दिवस मध्यम.शुभम भवतू!!