मी मंत्रिपदासाठी १ कोटींचा चेक दिलेला? मंत्र्यांच्या गौप्यस्फोटामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
मुंबई,मंडे टू मंडे न्युज नेटवर्क। राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी “उद्धव ठाकरे यांच्याकडे मी १ कोटींची चेक दिला होता”, असा गौप्यस्फोट केला, या गौप्यस्फोटामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. “मंत्रिपदासाठी पैसे मागितले की पक्षनिधीसाठी हे माहिती नाही”, असंही दीपक केसरकर म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मात्र चर्चांना उधाण आलं आहे.
दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत “मी १ कोटी रुपयांचा चेक दिला होता. पण मंत्रिपदाच्या आगाऊ दिले नव्हते. त्यामुळे पैसे आगाऊ दिले पाहिजेत तर तुमचं मंत्रीपद?”, असा सवाल केला. त्यांच्या या वक्तव्याने भुवया उंचावल्या . खरचं मंत्रिपदासाठी तब्बल १ कोटी रुपये उद्धव ठाकरे यांनी दीपक केसरकर यांच्या कडून घेतले होते? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय
आदित्य ठाकरेंनी हे आरोप फेटाळले
आदित्य ठाकरेंनी हे आरोप फेटाळले आहेत. “मला वाटतं खोट्या लोकांकडे किती लक्ष दिलं पाहिजे हे आपण ठरवलं पाहिजे. एवढे खोटं बोलून अशा लोकांवर कसा विश्वास ठेवायचा? एवढं खोटं बोलून हे लोकं स्वत: आरशात कसं बघतात? हा मला प्रश्न पडतो”, अशी प्रतिक्रिया युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी दीपक केसरकर यांच्या या आरोपांबाबत दिली.
“हे बघा मी चेक दिला. चेक दिल्याचा रेकॉर्ड असतो. मी एक कोटीचा चेक दिला आहे. याबाबत मी पत्र दिलं होतं. आता मंत्रिपदासाठी पैसे मागितले की निवडणुकीसाठी हे मी सांगू शकत नाही. पण ज्यादिवशी माझे एक पत्रकार मित्र आदित्य ठाकरेंना भेटायला गेले, तेव्हा त्यांनी आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारला की, कोकणातून कोण मंत्री असणार? त्यावर आदित्य ठाकरेंनी दीपक केसरकर यांच्याशिवाय आमच्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुसरं कोणतं नाव नाही. पण त्यांनी दिलेली कमिटमेंट पूर्ण केली नाही. याचा अर्थ काय होतो? कमिटमेंट म्हणजे काय? पैसे आगाऊ दिले पाहिजेत तर तुमचं मंत्रीपद? पक्षासाठी पैसे लागतात. ते चेकने देण्यात कुठलंही कमीपण नाही. ते अलाउड आहे”, असंही दीपक केसरकर म्हणाले. सिंधुदुर्गात माझ्या वाड-वडिलांनी कमावलेल्या या जमिनी आहेत. त्या मी फुकट, त्यांना पैसे पाहिजेत म्हणून वाटू शकत नाही. मंत्री नसलो म्हणून मला काही फरक पडत नाही. कारण आमच्या वाड-वडिलांनी जमिनी घेताना घाम गाळले आहेत. त्यांनी तेव्हा उद्योग सुरु केले म्हणून ही श्रीमंती आहे. माझी श्रीमंती कमी होतेय. मी महाराष्ट्रातला एकमेव आमदार आहे ज्याची श्रीमंती दर पाच वर्षाला कमी होतेय”, असं ही शेवटी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले.त्यांच्या या गौप्यस्फोटामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मात्र मोठी खळबळ उडाली आहे.