भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

राज्यात अनेक ठिकाणी अजान भोंग्यांशिवाय

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील अनधिकृत भोंगे आणि त्यामुळे होणारे ध्वनी प्रदूषण याबाबत आवाज उठविल्यानंतर आज मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पहाटेची अजान भोंग्यांचा वापराशिवाय झाली. कुर्ला येथील एससीएलआर जवळील विभागात तीन ते चार मोठ्या मशिदी आहेत. त्यामुळे इथे पहाटे 6 च्या आधीच मोठ्या आवाजात अजान होत असे. मात्र, आज या विभागात नमाज पठण झाले. पण लाउडस्पीकरवर अजान झाली नाही. दरम्यान, मुंबईमधील काही मोठ्या मशिदीच्या ट्रस्टींनी एकत्र येत पहाटेची अजान स्पीकरवर न करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, न्यायालयाच्या निर्णयाचे पालन आज कुर्ला परिसरात झाल्याचे समोर आले आहे. राज ठाकरे यांनी मशिदीवरील अनधिकृत भोंग्याबाबत आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर आता मुंबई मधील काही मोठ्या मशिदीच्या ट्रस्टी नी एकत्र येत पहाटे ची अजाण स्पीकरवर न करण्याचा निर्णय घेतला आहे. काल रात्री मुंबईच्या मशीद बंदर, भायखळा, मदनपुरा, नागपाडा, आग्रीपाडा इत्यादी परिसरात असलेल्या 26 मशिदीच्या ट्रस्टी, मौलवी आणि संबंधित लोकांनी एकत्र येत एक बैठक घेतली. यामध्ये पहाटे 6 वाजण्याच्या आधी होणारी अजान ही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लाउडस्पीकरचा वापर न करता करणार असल्याचा निर्णय त्यांनी घेतला.

आम्ही कोणाच्याही दबावाखाली नाही तर न्यायालयाचा आदेश आणि मुंबईत शांतता राहावी म्हणून हा समजूतदारपणे निर्णय घेतला असल्याचे इथे उपस्थित असलेल्या मशिदी संबंधीत ट्रस्टी आणि मौलवी यांनी सांगितले. भिवंडीत १५५ मशिदीत अजाण भोंग्यविनाच होणार असल्याचे मौलाना आणि मशिदीच्या विश्वस्थानीं सांगितले, तसेच पुण्या सह राज्यात इतर ठिकाणीही भोंग्याविण्याचं अजाण करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!